Gautam Gambhir Revelation: प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या क्रिकेटपटूच्या आवडी-निवडी जाणून घेण्याची खूपच उत्सुकता असते. खेळाडू अनेकदा त्यांच्या आवडी-निवडी सांगत असतात. मात्र, अनेकदा ते असा काही खुलासा करतात, ज्यामुळे प्रत्येकाच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. अशातच भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याच्या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
गौतम गंभीरचा खुलासा?
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा मागील काही दिवसांपासून भारतीय संघ आणि टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी त्यांच्या निवड प्रक्रियेबद्दलच्या विधानांवरून भलताच चर्चेत आहे. अशात त्याने स्वत:च्या आवडी-निवडीविषयी मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले आहे की, त्याने कधीही चहा किंवा कॉफीचे सेवन केले नाहीये.
गंभीरने कधीच केले नाही चहा-कॉफीचे सेवन
नुकतेच एका मुलाखतीत गंभीरला ‘हे की ते’ या प्रकारात स्पोर्ट्सकीडा या क्रिकेट वेबसाईटने प्रश्न विचारले होते. यामध्ये गंभीरने वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. यातच एक प्रश्न होता की, चहा की कॉफी? या प्रश्नाचे उत्तर देताना गंभीरने गंभीर म्हणाला, “मी कधीच चहा किंवा कॉफी पिण्याचा प्रयत्न केला नाही.” यावेळी गंभीरचे उत्तर ऐकून मुलाखत घेणारी व्यक्तीही हैराण झाली.
गंभीरचा नुकताच झालेला वाद
अलीकडेच लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 (Legends League Cricket 2023) स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात गौतम गंभीर आणि एस श्रीसंत (Gautam Gambhir And S Sreesanth) यांच्यात वाद झाला होता. त्यांच्यातील वाद वाढू नये म्हणून पंच आणि इतर खेळाडूंनीही मध्यस्थी करत वाद मिटवला होता. यानंतर श्रीसंतने या घटनेबद्दल व्हिडिओ शेअर करत गंभीरवर टीका केली होती. मात्र, गंभीरने माध्यमांशी बोलताना याविषयी भाष्य करण्यास नकार दिला होता. (Gautam Gambhir big revelation said I have never tried tea or coffee read)
हेही वाचा-
WPL 2024: लिलावातील 1 कोटी 30 लाख रुपयांतून आई-वडिलांसाठी ‘ही’ गोष्ट करणार Vrinda Dinesh, वाचून अभिमानच वाटेल
पाटलांच्या लेकीने आणले इंग्लिश फलंदाजांच्या नाकी नऊ, पदार्पणाच्या मालिकेत POTM पुरस्कार जिंकताच म्हणाली…