इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना सोमवारी (29 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला. मात्र, रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सामन्यात अखेर एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. सीएसके आता आयपीएल इतिहासात पाच वेळा चॅम्पियन ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. त्यानंतर चेन्नईचे अभिनंदन करताना माजी भारतीय क्रिकेटपटू व लखनऊ सुपरजायंट्स संघाचा मेंटर गौतम गंभीर याने ट्विट करताना आरसीबीच्या संघाला डिवचले.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात रवींद्र जडेजाच्या अखेरच्या दोन चेंडूतील फिनिशमुळे चेन्नई आपले पाचवे विजेतेपद उंचावू शकली. त्यानंतर जगभरातून चेन्नई संघाचे कौतुक केले जात आहे. गंभीर याने देखील ट्विट करत लिहिले,
Congratulations CSK! Winning 1 title is difficult, winning 5 is unbelievable! #IPL2023
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 30, 2023
‘अभिनंदन सीएसके! या स्पर्धेत एक ट्रॉफी जिंकणे अवघड आहे तिथे तुम्ही पाच ट्रॉफी जिंकले आहात. अविश्वसनीय’
अनेक जण त्याच्या या ट्विटचा संदर्भात थेट रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाशी जोडत आहेत. चालू हंगामात लखनऊ व बेंगलोर यांच्यातील सामने अत्यंत अटीतटीचे झाले. या दोन्ही संघातील खेळाडूंदरम्यान मोठा वाद पाहायला मिळाला. संपूर्ण हंगामाभर आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली व लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यातील वाद चालूच राहिला होता.
आरसीबीला आत्तापर्यंत 16 हंगाम झाले तरी एकदाही या स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले नाही. आयपीएल मध्ये सर्वाधिक पाच विजेतेपदे प्रत्येकी मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्या नावे आहेत. तर, गंभीरच्याच नेतृत्वात केकेआरने दोनदा ही ट्रॉफी उंचावली होती. याव्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद व गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी एकदा या सर्वात मोठ्या व्यावसायिक टी20 लीगचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
(Gautam Gambhir Congratulations Tweet For CSK But Take Dig On RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राचे ‘6’ मावळे ज्यांनी गाजवलाय आयपीएलचा सोळावा हंगाम, चौघांनी तर ट्रॉफीच जिंकलीये
नाचू किती…! ढोल वाजू लागताच दीपक चाहरने सुरु केला भांगडा, बेभान होऊन नाचला; बायकोनेही दिली साथ