कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. केकेआर या हंगामात प्लेऑफ मध्ये पात्र होणारा पहिला संघ ठरला. यानंतर केकेआरनं पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये विजय मिळवून फायनल मध्येही प्रवेश केला. आता अंतिम सामना केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे.
केकेआरच्या या हंगामातील संपूर्ण प्रवासात गौतम गंभीरची भूमिका खूप महत्वाची राहिली आहे. गंभीरचा एक फार्म्यूला आहे, जो या आयपीएलमध्ये केकेआरसाठी यशस्वी ठरला. आता फायनलमध्ये पण हा फार्म्यूला काम करेल का? हे पाहणं महत्वाचं राहील.
कोलकाताच्या संपूर्ण विजयी प्रवासात गंभीरची भूमिका महत्वाची राहली आहे. केकेआरनं या मोसमात सुनील नारायणला सलामी करण्याची संधी दिली. त्याचा संघाला चांगलाच फायदा झाला आहे. नारायणनं आक्रमक फलंदाजी करत संघासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. गंभीरच्या या गेम प्लॅनमुळे सुनील नारायणला सलामी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. नारायणनं 13 सामन्यांत 482 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. यासोबतच गोलंदाजीत त्यानं 16 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
आयपीएलच्या साखळी सामन्यात कोलकातानं हैदराबादचा पराभव केला होता. केकेआरनं हा सामना 4 धावांनी जिंकला होता. यानंतर पुन्हा क्वालिफायर 1 मध्ये देखील केकेआरनं हैदराबादला 8 गडी राखून मात दिली होती. हैदराबादनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान राॅयल्सला नमवून फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात आज (26 मे) रोजी अंतिम सामना रंगणार आहे. चेन्नई येथील चेपाॅक स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. गाैतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरनं 2012 आणि 2014 साली आयपीएलची ट्राॅफी उचलली होती. यंदाच्या हंगामात गाैतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटाॅर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फायनलपूर्वी भुवनेश्वर कुमारनं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “आता आम्ही फायनलमध्ये…”
आयपीएल फायनलची जगभरात चर्चा! प्रसिद्ध रॅपरनं लावला शाहरुख खानच्या टीमवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा
आयपीएलच्या फायनलमध्ये ‘हे’ 5 खेळाडू खळबळ माजवू शकतात! ट्रॉफी जिंकण्यासाठी यांना रोखणं गरजेच