आगामी इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहत्यांना आतुरता लागली आहे. 31 ऑक्टोबर रोजी सर्व संघांनी आपल्या रिटेन्शन याद्या जाहीर केल्या. त्यामुळे अनेक मोठ्या संघांची चर्चा जोरात सुरू आहे. त्यापैकी एक नाव आहे शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) संघाचे केकेआरचे, ज्यांनी चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) रिलीज करून आश्चर्यचकित केले. पण आता शाहरूखला संघातील आणखी एका दिग्गज खेळाडूची उणीव भासत आहे.
शाहरूख खान 2 नोव्हेंबर 2024 रोजी 59 वर्षांचा झाला. तेव्हा गौतम गंभीरने (Gautam Gambhir) त्याच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. केकेआरचा माजी कर्णधार आणि मार्गदर्शक गौतम गंभीरने विनोदीपणे लिहिले, “प्रत्येक वेळी 25 वर्षांची होणाऱ्या व्यक्तीसाठी. तुमची उर्जा, करिष्मा आणि आकर्षण प्रत्येक उत्तीर्ण वर्षासह वाढत आहे. शाहरुख खानवर तुम्ही नेहमीच प्रेम पसरवत राहा.” याला उत्तर देताना शाहरुख खानने जबरदस्त उत्तर दिले.
शाहरुख खानने (Shahrukh Khan) गौतम गंभीरला (Gautam Gambhir) उत्तर देताना लिहिले, “मी 25 वर्षांचा आहे? मला वाटले की मी लहान आहे… हा हा… ही प्रेरणा असल्याबद्दल गौतम गंभीरचे आभार. तू नेहमीच माझा कर्णधार राहशील. लव्ह यू.”
केकेआरच्या 2025च्या रिटेन्शन यादीबद्दल बोलायचे झाले, तर संघाने तिसरे जेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) कायम ठेवले नाही. केकेआरने 6 खेळाडूंना कायम ठेवले. ज्यामध्ये रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा आणि रमनदीप सिंग यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या मेगा लिलावात उतरणार 1500 पेक्षा जास्त खेळाडू, तारिख आणि ठिकाणही समोर
Ind vs Sa; सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रचू शकतो इतिहास
“तो जागतिक दर्जाचा खेळाडू पण…”, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे केएल राहुलला चँलेज