सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शनिवारी रात्री 25 जानेवारी रोजी दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडचा 2 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या विजयाचा नायक 22 वर्षीय तिलक वर्मा ठरला.त्याने 72 धावांची नाबाद खेळी खेळली. ही खेळी अतिशय कठीण परिस्थितीत आली. बदलत्या चेन्नईच्या खेळपट्टीवर जिथे फलंदाजांना क्रीजवर टिकून राहणे कठीण होत. तिथे या डावखुऱ्या खेळाडूने खळबळ उडवून देत अर्धशतकी खेळी खेळली. तिलक वर्माने त्याच्या खेळीचे श्रेय काही प्रमाणात प्रशिक्षक गौतम गंभीरला दिले. सामन्यानंतर त्याने गंभीरकडून काय सल्ला मिळाला ते सांगितले.
सामन्यानंचप बोलताना तिलत वर्मा म्हणाला, गाैती भाईंनी मला मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले परिस्थितीनुसार तुला शेवट पर्यंत खेळायचे आहे. आम्हाला माहित होतो प्रति षटक 10 धावांची आवश्यकता असले तरी आपण सामना जिंकू शकतो. पण मला क्रीझवर शेवट पर्यंत थांबायचे होते. त्यामुळे मी शेवटच्या षटकापर्यंत सावधगीरीने खेळत होतो. दुसऱ्या टोकाने सुंदर आणि बिश्नोईने चांगली साथ दिली. आम्ही याआधी दक्षिण आफ्रिकेत आधीच वेगवान गोलंदाजांचा सामना केले आहे. त्यामुळे आम्ही आर्चर आणि वूड सारख्या वेगवान गोलंदाजांसाठी तयार होतो. आमच्या खेळाडूंनी चांगली तयारी केली. आम्ही नेटमध्ये कठोर परिश्रम केले आणि आम्हाला त्याचे चांगले फळ मिळाले.
एक वेळ अशी होती जेव्हा भारताने 17 षटकांत 146 धावांवर 8 विकेट गमावल्या होत्या आणि संघाला 20 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर तिलकने बिश्नोईसोबत खेळ बदलणारी भागीदारी केली. बिश्नोई 10 व्या क्रमांकावर आला आणि त्याने 5 चेंडूंचा सामना केला. ज्यामध्ये तो 2 चौकारांसह 9 धावांवर नाबाद राहिला. तिलक वर्माला त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले.
दरम्यान आता मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना 28 जानेवारी रोजी खेळवला जाईल. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका खिश्यात घालण्याच्या हेतू मैदानात उतरेल.
हेही वाचा-
वानिंदू हसरंगाने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला, 300 विकेट्स घेत केला भीमपराक्रम
तिलक वर्मा समोर सूर्याचा नमन, 22 वर्षीय खेळाडूच्या प्रतिक्रियेने जिंकली मने, पाहा VIDEO
तिलक वर्माने रचला विश्वविक्रम, शेवटच्या 4 डावात नाॅट-आऊट, खेचल्या एवढ्या धावा