भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आत्तापर्यंत अनेक यशाची शिखरे पदक्रांत केली आहेत. त्याने भारतीय संघाची ‘रनमशीन’ असा नावलौकिकही मिळवला आहे. त्याने त्याच्या आत्तापर्यंतच्या १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तब्बल ७० शतके केली आहेत. तो सचिन तेंडुलकर (१००) आणि रिकी पाँटिंग (७१) यांच्या पाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. पण विराटच्या या ७० शतकांच्या प्रवासाला सुरुवात झाली ती २४ डिसेंबर २००९ ला. याचदिवशी त्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.
त्याने २४ डिसेंबर २००९ रोजी भारत विरुद्ध श्रीलंका संघात इडन गार्डन, कोलकता येथे पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात हे शतक केले होते. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३१५ धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंकेकडून उपुल थरंगाने ११८ धावांची आणि कुमार संगकाराने ६० धावांची खेळी केली होती.
त्यानंतर भारतासमोर ३१६ धावांचे लक्ष्य असताना विरेंद्र सेहवाग(१०) आणि सचिन तेंडूलकर(८) यांची सलामी जोडी लवकर बाद झाली. त्यामुळे फलंदाजीला गौतम गंभीर आणि युवा विराट कोहली हे दोघे उतरले. या दोघांनीही भारताचा डाव सावरताना तिसऱ्या विकेटसाठी २२४ धावांची द्विशतकी भागीदारीही रचली. भारताचा हा डाव सावरताना गंभीर आणि विराट दोघांनीही शतके केली.
विराटचे हे पहिलेच वनडे शतक होते. विराटने ११४ चेंडूत १०७ धावा केल्या. यात त्याच्या ११ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. विराट ४० व्या षटकात सुरज रणदिवने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. विराटचा झेल राखीव क्षेत्ररक्षक पुष्पकुमाराने घेतला.
विराट बाद झाल्यानंतरही गंभीरने दिनेश कार्तिकला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात गंभीरने नाबाद १५० धावांची दिडशतकी खेळी केली होती.
#OnThisDay in 2009, @imVkohli scored the first of his 70 international centuries, in an ODI against SL.@GautamGambhir also scored a century and received the Player of the Match award, but famously handed it over to Kohli 👌
🎥@BCCIpic.twitter.com/H6EoD2D49K
— Wisden India (@WisdenIndia) December 24, 2020
गंभीरने स्वत:चा सामनावीर पुरस्कार दिला युवा विराटला
सामना संपल्यानंतर रवी शास्त्रींनी गंभीरला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी बोलावले. पण गंभीरने हा पुरस्कार नाकारत तो २१ वर्षीय युवा फलंदाज कोहलीला दिला. कारण विराटने त्याचे पहिले वनडे शतक केले होते, त्यामुळे त्याचे कौतुक आणि त्यावेळीच्या धैर्याबद्दल त्याला गंभीरने ही खास भेट विराटला देऊ केली होती.
*A 2009 match*@GautamGambhir (150*) gives his MoM to @imVkohli (107).
[as his equally imp contribution in win & his 1st ODI ton] pic.twitter.com/KOIfHb6Pyr— आचार्य जी (@gurugrameen) October 14, 2018
त्यावेळी गंभीरने सामना संपल्यानंतर म्हटले होते की, ‘आम्ही पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्या होत्या. त्यावेळी तो सकारात्मक खेळला आणि त्याने जलद धावा करत मला चांगली साथ दिली होती. विराटने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळे माझ्या खांद्यावरचे मोठे ओझे हलके झाले.’
ट्रेंडिंग लेख –
…अन् पियुष चावलाने घेतलेल्या त्या विकेटचा एका वर्षात सचिनने घेतला बदला
गुडबाय २०२०: या’ पाच क्रीडासुंदरींनी घेतली यावर्षी निवृत्ती; एक होती जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू
स्लेजिंग करणार्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ जबरदस्त खेळ्या
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! पुढील ६ महिन्यांसाठी टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज संघातून बाहेर
‘कृपा कर आणि आता पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचाही राजीनामा दे’, चाहत्यांची जोरदार मागणी
मोठी बातमी! विश्वचषकात पहिली हॅट्रिक घेणारा क्रिकेटपटू बनला भारतीय निवड समीतीचा प्रमुख