भारतीय संघ उद्यापासून (19 सप्टेंबर) बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. पहिला सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये रिषभ पंत (Rishabh pant) किंवा ध्रुव जुरेलला (Dhruv Jurel) संधी मिळणार का, हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. तत्पूर्वी भारतीय प्रशिक्षकाने याबद्दल सांगितले आहे.
पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या गौतम गंभीरने (Gautam Gambhir) यष्टीरक्षक-फलंदाज निवडीबाबत सांगितले ते म्हणाले की, “आम्ही कोणालाच वगळत नाही. आम्ही फक्त तेच खेळाडू निवडू जे प्लेइंग इलेव्हन मध्ये बसतील. आम्ही प्लेइंग इलेव्हन निवडण्यावर विश्वास ठेवतो. जुरेल हा अप्रतिम खेळाडू आहे पण पंत कधी येतो, कधी कधी वाट पाहावी लागते. तुम्हाला त्याच्यासाठी थोडी वाट पहावी लागेल.”
पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ 3 स्टार महिला क्रिकेटर आपल्या सौंदर्याने सोशल मीडियावर खूप लोकप्रिय!
6 विकेट घेताच जडेजाच्या नावे होणार अनोखा रेकॉर्ड, केवळ 2 भारतीयांनी केली ही कामगिरी
“आजकाल निवृत्ती हा एक…” भारतीय कर्णधाराचे मोठे वक्तव्य