भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर चार वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. गौतम गंभीर लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भाग घेणार आहे. लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळणार असल्याची पुष्टी खुद्द गौतम गंभीरने केली आहे. गौतम गंभीर हा भारतासाठी २००७मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा एक भाग आहे.
गौतम गंभीर हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. २०११च्या विश्वचषक फायनलमध्ये गौतम गंभीरने ९७ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आणि टीम इंडियाला विश्वविजेते बनवले. इतकेच नाही तर गौतम गंभीरने २००७च्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ७५ धावांची शानदार इनिंगही खेळली होती. गंभीरचा आयपीएलमध्येही चांगला रेकॉर्ड होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्स संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये विजेतेपद पटकावले होते.
गौतम गंभीर म्हणाला की, “मला हे कळवण्यास आनंद होत आहे की मी लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भाग घेणार आहे. १७ सप्टेंबरपासून मी लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. मी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर येण्यास उत्सुक आहे. क्रिकेटच्या मैदानावर येणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
१७ सप्टेंबरपासून लीग सुरू होणार आहे
लेजेंड्स लीग क्रिकेटचे सीईओ रमण रहेजा यांनीही गंभीरच्या खेळावर आनंद व्यक्त केला आहे. रहेजा म्हणाला, गंभीरचे क्रिकेट मैदानावरील योगदान कोण विसरू शकेल. गंभीरने भारताला विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले. गंभीरच्या आगमनाने लिजेंड्स लीग क्रिकेटचा अनुभव आणखीनच नेत्रदीपक होणार आहे.
दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी भारत महाराज आणि जागतिक दिग्गज यांच्यात एक विशेष सामना आयोजित केला जाणार आहे. यानंतर १७ सप्टेंबरपासून लिजेंड्स लीग क्रिकेट सुरू होईल. इंडिया महाराजाचे नेतृत्व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली करणार आहेत. जागतिक दिग्गजांचे नेतृत्व इऑन मॉर्गन करणार आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘क्या कोहली बनेगा रे तू?’ म्हणत चाहत्यांनी उडवली पोट वाढत असलेल्या आझमची खिल्ली
दे घुमा के! पाच सिक्स अन् सहा फोर, आंद्रे रसेलने फक्त ११ चेंडूत ठोकले अर्धशतक
राष्ट्रगीत सुरू असताना भर मैदानात इशान किशनवर ‘हल्ला’! खूप घाबरला भारतीय क्रिकेटर