---Advertisement---

गौतम गंभीरची नवी इंनिंग, केला या राजकीय पक्षात प्रवेश..

On: शुक्रवार, मार्च 22, 2019 6:39 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आज(22 मार्च) प्रवेश केला आहे.

गंभीरने पक्षात प्रवेश केल्याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल, असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यापासून प्रभावित होऊन मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे गौतम गंभीर याने यावेळी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत दिल्ली काबीज करण्याच्या मनसुब्याने भाजप या निवडणुकीत पुरेपूर प्रयत्न करत असून काही मोठे बदल केले जातील, असे पक्षाने स्पष्ट केले होते आणि क्रिकेटपटू गौतम गंभीरचा भाजप प्रवेश याच बदलाचा एक हिस्सा असल्याचे म्हटले जात आहे.

प्रसारमाध्यमांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे गौतम गंभीरच्या लोकसभा निवडणूक तिकिटाबाबत विचारणा केली असता, ही जबाबदारी सर्वस्वी पक्षाची आहे असे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.

याअगोदर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिने देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कालच(२१ मार्च) भारतीय जनता पक्षाने आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे गौतम गंभीरला दुसऱ्या यादीत स्थान मिळते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

–आयपीएल २०१३ स्पॉट फिक्सिंगवर एमएस धोनीने अखेर सोडले मौन..

–फक्त गौतम गंभीरच नाही, तर या ५ क्रिकेटपटूंनीही आजमावले आहे राजकारणात नशीब

–चेन्नई सुपर किंग्सकडून एमएस धोनी करणार या क्रमांकावर फलंदाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment