India Tour Of Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघाला नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांच्या प्रशिक्षणाखाली 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर टी20 आणि वनडे मालिका खेळायच्या आहेत. येत्या काही दिवसांत श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. तत्पूर्वी मोठी बातमी समोर येत असून नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना वनडे मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडू संघात हवे आहेत.
टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे मोठ्या सुट्टीवर आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावरही हे वरिष्ठ खेळाडू अनुपलब्ध असतील, असे म्हटले जात होते. परंतु प्रशिक्षक गंभीर यांना सर्व वरिष्ठ खेळाडू वनडे संघात हवेच आहेत. त्यामुळे गंभीर यांनी रोहित, विराट, बुमराह आणि जडेजाला सुट्टी संपवून लवकर परत या असा संदेश पाठवला आहे, असे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान टी20 विश्वचषक 2024 नंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. त्यांच्यानंतर प्रशिक्षकपदाची सूत्रे गंभीर यांच्या हाती आली आहेत. गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 27 जुलै ते 30 जुलै या कालावधीत 3 सामन्यांची टी20 मालिका आणि 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांनी टी20 विश्वचषकानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरुपातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे हे खेळाडू टी20 मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. परंतु वनडे मालिकेत या वरिष्ठ खेळा़डूंचा जलवा पाहायला मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
आंद्रे रसलची एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?