जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा सोळावा हंगाम नुकताच समाप्त झाला. आयपीएल समाप्त होऊन महिनाभराचा अवधी लोटला असतानाच संघांनी आता पुढील हंगामाची तयारी देखील सुरू केली आहे. आपल्या पहिल्या दोन हंगामात प्ले ऑफपर्यंत मजल मारणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला नवे प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. तसेच भारताचा माजी सलामीवीर व कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर हा पुन्हा एकदा केकेआरचा भाग बनू शकतो.
माध्यमातील वृत्तानुसार, लखनऊ संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍंडी फ्लावर यांच्या जागी ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. याबाबतच्या हालचाली संघ व्यवस्थापनाने सुरू केल्या आहेत. यासोबतच संघाचे मेंटर असलेल्या गौतम गंभीर यांची देखील जागा जाऊ शकते.
अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स गंभीरला पुन्हा एकदा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जाते. ते त्याला संघाचा मेंटर म्हणून नियुक्त करू शकतात. सध्या केकेआर संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित हे आहेत.
गंभीर हा 2011 ते 2017 या कालावधीत केकेआरचा कर्णधार होता. त्याच्याच नेतृत्वात केकेआरने 2012 व 2014 असे दोन वर्ष आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले. गंभीरने संघाची साथ सोडल्यानंतर सहा वर्षात संघ केवळ दोन वेळा प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करू शकला आहे. अशा परिस्थितीत संघाला पुन्हा एकदा यशस्वी कररण्याची धुरा गंभीरकडे दिली जाऊ शकते. यासाठी संघाचे सीईओ वेंकी मैसूर व स्वतः संघमालक शाहरुख खान हे प्रयत्न करताना दिसू शकतात.
(Gautam Gambhir Might Be Mentor KKR Justin Langer Might Join LSG)
महत्वाच्या बातम्या-
नाईट रायडर्सचे नेतृत्व नरीनच्या हाती! अमेरिकेत उडणार टी20 क्रिकेटचा धुरळा, ‘हे’ दिग्गज ही साथीला
पाकिस्तानला नडणार अतिशहाणपणा! ‘या’ संघाला वर्ल्डकपमध्ये प्रवेश देण्याची आयसीसीची तयारी