राहुल द्रविड आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 विश्वचषक उंचावला. विश्वचषकाच्या यशनंतर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. नवीन हेड कोच म्हणमून बीसीसीआयने गाैतम गंभीरची नियुक्ती केली. गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. तो सध्या टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. पण या सगळ्या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटर तन्वीर अहमदने गंभीरवर आरोप करत राजकारणातून मुख्य प्रशिक्षकपद मिळवल्याचा आरोप केला आहे. तनवीर म्हणतो की, गंभीरपेक्षा व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकपदासाठी अधिक पात्र होता.
तन्वीर यांनी लिहिले भारतात ‘पर्ची’ चा अर्थ ‘पावती’ असा समजला जातो, पण पाकिस्तानमध्ये ‘पर्ची’ म्हणजे फसव्या मार्गाने किंवा काही संबंधाच्या आधारे काही काम करून घेणे. त्यामुळे सोप्या भाषेत समजले तर गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक होण्याचा अधिकार नाही आणि संबंधांच्या जोरावर त्याने हे पद मिळवले असा आरोप तनवीरने केला आहे.
VVS Laxman ko indian team ka head caoch hona chahiye tha kyun k woh india B k sath kafi time say head coach kam kar raha ha lagta ha Gautham Gambhir parchi par aya ha
— Tanveer Says (@ImTanveerA) July 22, 2024
नॅशनल क्रिकेट अकादमीचे (NCA) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण दीर्घकाळापासून भारतीय ‘ब’ संघाशी संबंधित आहेत, असा पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा दावा निश्चितच खरा आहे. गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले तेव्हा ते संघाचे प्रशिक्षक होते. लक्ष्मणने नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यातही टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेचा 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 ने पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या-
असा द्रविड मी कधीच पाहिला नव्हता…! आर अश्विनने सांगितला आतापर्यंतचा सर्वात भन्नाट किस्सा
‘खेलो इंडिया’साठी अर्थमंत्र्यांनी उघडली तिजोरी, वाचा यंदाच्या अर्थसंकल्पातून क्रीडा मंत्रालयाला काय मिळाले?
आयपीएलची रंगत वाढणार, 6 वर्षांनंतर युवराज सिंगची एन्ट्री होणार? ‘या’ दिग्गजाची जागा घेणार