भारताने झिम्बाब्वे दौऱ्याची सुरूवात विजयाने केली आहे. तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना जिंकत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारताला एकही सामना जिंकला आला नव्हता. त्यामुळे हा विजय भारतासाठी विशेष होता. या दौऱ्यातून वरिष्ठ संघाच्या सपोर्ट स्टाफला विश्रांती देण्यात आली असून संघ व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत. त्यांनी आल्याबरोबर ड्रेसिंग रूममध्ये नवा पुरस्कार सुरू केला आहे.
अंतरिम प्रशिक्षक म्हणून लक्ष्मण यांनी संघाची संस्कृती अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये ‘बेस्ट ऍटिट्यूड ऑफ द मॅच अवॉर्ड’ सुरू केला आहे. या खास पुरस्काराच्या पहिल्या विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
तिलक वर्माने जिंकला पहिला पुरस्कार
लक्ष्मण यांच्या पुढाकारावरून दिसून येते की, धावा आणि विकेट्स यांच्याबरोबर कठोर परिश्रम, मानसिकता आणि शिस्तही महत्त्वाचे आहेत. पहिल्या सामन्यानंतर उपकर्णधार-फलंदाज तिलक वर्माने ‘सर्वोत्कृष्ठ वृत्ती पुरस्कारसाठी’चे पहिले पदक जिंकले.
पहिल्या सामन्यात तिलकची कामगिरी काही खास राहिली नाही, मात्र त्याने मैदानावर संघसहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे, उर्जा टिकवून ठेवणे आणि दबावाखाली शांत राहणे या गुणांच्या आधारावर हा पुरस्कार जिंकला.
लक्ष्मण यांनी पुरस्काराबद्दल म्हटले, “वृत्ती ही कौशल्याच्या बरोबरीची असते. संघ व्यवस्थापक म्हणून आम्ही विचार केला की, या मालिकेतील तीन सामन्यामध्ये केवळ क्षेत्ररक्षण, गोलंदाजी किंवा फलंदाजीमधील वैयक्तिक उत्कृष्टेलाच नव्हे, तर वृत्तीच्या पैलूलाही पुरस्कृत करू.”
इंग्लंड दौऱ्यानंतर अवघ्या चार दिवसांत भारत झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला. यामध्ये तीन टी 20 सामने खेळले जाणार आहेत. लक्ष्मण यांनी याआधीही झिम्बाब्वे दौऱ्यात भारताचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. 2024 मध्ये त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली होती.
(Gautam Gambhir on breaks VVS Laxman introduces Best Attitude of the Match Award in ZIM vs IND T20 series Tilak Varma)






