राजस्थान राॅयल्स (RR) संघाचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याची आगामी टी20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) भारतीय संघात निवड झाली आहे. सॅमसननं (Sanju Samson) आयपीएल 2024 मध्ये त्याच्या संघासाठी उत्तम कामगिरी केली आहे. त्यानं यां हंगामात 13 सामन्यांमध्ये 156.52 च्या स्ट्राइक रेटनं फलंदाटीजी करत 5 अर्धशतकांसह 504 धावा कुटल्या आहेत. राजस्थानला प्ले-ऑफमध्ये पोहचवण्यात त्याचं मोलाचं योगदान राहिलं. राजस्थानचा संघ 16 अंकांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
2015 साली भारताकडून पदार्पण करणाऱ्या सॅमसनसाठी हा पहिलाच विश्वचषक आहे. आयपीएल 2024 मधील त्याची कामगिरी पाहून निवड समितीनं त्याच्यावर विश्वास दाखवला. सॅमसनच्या कारकिर्दीसाठी हा विश्वचषक खूप महत्त्वाचा ठरणार असून, यामध्ये त्यानं उत्तम कामगिरी केली तर तो भारतासाठी नियमित सामने खेळताना दिसेल. अन्यथा भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी पुन्हा बंद होतील.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि सध्या आयपीएलमध्ये केकेआरचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरनं 29 वर्षीय संजू सॅमसनला मोलाचा सल्ला दिला आहे. ‘स्पोर्ट्सकिडा’शी बोलताना गंभीर म्हणाला की, “सॅमसनकडे खूप अनुभव आहे. परंतु त्यानं स्वत:ला इतरांसमोर सिद्ध करायला हवं. भारतीय संघासाठी त्याला सामने जिंकावे लागतील. तो आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला आहे. त्याच्यात किती क्षमता आहे, हे त्याला दाखवावं लागेल. संपूर्ण जग त्याला पाहतंय.”
आयपीएल 2024 च्या हंगामात साखळीफेरीचे चार सामने बाकी असून, प्ले-ऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR), राजस्थान राॅयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या तीन संघांनी क्वालिफाय केलं आहे. अजूनही राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हे दोन संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत आहेत. 16 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स या पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला. यासह हैदराबादचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला, तर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा पत्ता कट झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहली, रोहित नाही तर हे आहेत जय शाह यांचे 3 आवडते क्रिकेटपटू, जाणून घ्या
मुंबई इंडियन्सनं रिटेन नाही केलं तर रोहित शर्मा कोणत्या टीममध्ये जाणार? हिटमॅनकडे आहेत ‘हे’ पर्याय
जोस बटलर तर गेला, आता सलामीवीर म्हणून कोण खेळणार? राजस्थान रॉयल्सकडे आहेत ‘हे’ 3 पर्याय