सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली. याच वर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात या मालिकेतून झाली. मात्र त्याचवेळी या मालिकेत समालोचन असलेला भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने विश्वचषकासाठीच्या आपल्या चार फिरकीपटूंबाबत मत व्यक्त केले आहे.
कोलकाता येथील दुसऱ्या वनडे सामन्यावेळी समालोचन करत असताना त्याला विश्वचषकासाठीच्या भारतीय संघाबाबत विचारण्यात आले. या विश्वचषकासाठी फिरकीपटू म्हणून कोणाला पसंती द्यावी असे विचारले असता तो म्हणाला,
“अक्षर पटेल हा विश्वचषकासाठी माझा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू असेल. मागील काही महिन्यांपासून तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय. त्या व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर हा अष्टपैलू म्हणून एक पर्याय देईल. तर, भारतीय वातावरणात कुलदीप यादव याचा देखील संघाला फायदा होईल. चौथा फिरकीपटू म्हणून माझी रवी बिश्नोई याला पसंती राहील. तो सध्या संघाचा भाग नसला तरी, भारत आणखी बरेच सामने खेळणार आहे. त्यामध्ये त्याला संधी दिली जाऊ शकते.”
गंभीरने या विश्वचषक संघात प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा व अनुभवी युझवेंद्र चहल यांना स्थान दिले नाही. जडेजा दुखापतीमुळे मागील सहा महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. तर, चहल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. भारतातच होत असलेल्या या वनडे विश्वचषकाआधी भारतीय संघाला कमीत कमी 20 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. बीसीसीआयने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की, विश्वचषकाच्या दृष्टीने केवळ 20 खेळाडूंना बदलून संधी दिली जाईल.
(Gautam Gambhir Pick His Four Spinners For ODI World Cup Jadeja Chahal Excluded)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला हटवून विराटल हवी होती टीम इंडियाची कॅप्टन्सी! माजी प्रशिक्षकाच्या दाव्याने खळबळ
‘जय शाह सर…’, रणजीमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉचा बीसीसीआय सचिवांना रिप्लाय