भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने त्याच्या सार्वकालिन भारतीय कसोटी संघाची निवड केली आहे. त्याने या संघात त्या खेळाडूंना स्थान दिले आहे, ज्यांना त्याने खेळताना पाहिले आहे किंवा तो त्यांच्यासोबत खेळला आहे. विशेष म्हणजे, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला त्याने आपल्या संघात सामाविष्ट केले आहे. पण, त्याला संघाचे कर्णधारपद सोपवले नाही. Gautam Gambhir picks his all time indian test 11.
स्पोर्ट्स तकशी बोलताना गंभीरने सांगितले की, “आपल्या सार्वकालिन कसोटी संघात सलामीला फलंदाजी करण्यासाठी त्याने माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग यांची निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड तर चौथ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान देण्यात आले आहे.”
“भारताचा कर्णधार विराट कोहली हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तर, धोनीची सहाव्या क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. शिवाय, अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून कपिल देव यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गोलंदाजीसाठी हरभजन सिंग, अनिल कुंबळे, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ या ४ गोलंदाजांची निवड केली आहे.”
काही दिवसांपुर्वी, सध्याचा खासदार गंभीरने कुंबळेच्या नेतृत्वाची प्रशंसा केली होती. विशेष म्हणजे, या संघात ७ असे खेळाडू आहेत, जे वेगवेगळ्या वेळेला भारतीय संघाचे कर्णधार होते. तरीही, गंभीरने आपल्या संघाचे कर्णधारपद कुंबळेच्या हाती सोपवले आहे.
तसे पाहिले तर, आपल्या सार्वकालीन कसोटी संघात गंभीरने सर्व दिग्गज खेळाडूंना निवडले आहे. भारतासाठी या सर्वांनी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच, संघात ३ असेही खेळाडू आहेत, ज्यांनी कसोटीत १० हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
गौतम गंभीरचा सार्वकालीन भारतीय कसोटी संघ –
सुनील गावसकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी (यष्टीरक्षक), कपिल देव, हरभजन सिंग, अनिल कुंबळे (कर्णधार), झहीर खान, जवागल श्रीनाथ.
ट्रेंडिंग घडामोडी-
डीआरएस सिस्टीम तेव्हा असती तर भारताच्या या गोलंदाजाने घेतल्या असत्या ९०० विकेट्स
एकही परदेशी खेळाडूचा समावेश न करता अशी बनु शकते सीएसकेची दमदार टीम