भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. गौतम गंभीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. मागच्या काही वर्षांमध्ये गंभीरने अनेकदा धोनीवर टीका केली आहे. मात्र, त्याच्या एका ताज्या वक्तव्यामुळे चाहते काहीशे आश्चर्यचकित झाले आहेत.
समालोचकाच्या भूमिकेत असताना गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने अनेकदा 2011साली भारताने जिंकलेल्या वनडे विश्वचषकाबाबत बोलतो. गंभीरच्या मते हा विश्वचषक जिंकण्यासाठी संपूर्ण भारतीय संघाने मेहनत घेतली. मात्र, मीडिया आणि सोशल मीडियावर कौतुक मात्र एकट्या एमएस धोनी (MS Dhoni) याचे होत असते. याच गोष्टीचा त्याने अनेकदा विरोध देखील केला आहे. आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे भारताचा माजी सलामीवीर फलंदाज अनेकदा टीकेचा धनी देखील झाला आहे. असे असले तरी, नुकत्याच दिलेल्या एका प्रतिक्रियात गंभीरने धोनीबाबत कौतुक केल्याचे पाहायला मिळते.
गौतम गंभीर याच्या मते एमएस धोनी याने कर्णधार बनल्यानंतर संघासाठी आपल्या वैयक्तिक आकड्यांकडे काही प्रमाणात कमी लक्ष दिले. कारण तो संघाचा कर्णधार नसता, तर फिनिशरच्या जागी आधी खेळला असता आणि त्याची धावसंख्याही अधिक असती. एका माध्यमाशी बोलताना गंभीर म्हणाला, “एमएस धोनी याने संघ आणि ट्रॉफीसाठी आपल्या आंतरराष्ट्रीय धावांचे बलिदान दिले. कर्णधार नसता, तर तो भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळला असता. परिणामी त्याला अधिक धावा करता आल्या असत्या. पण त्याने आपल्यामधील फलंदाजाचा त्याग केला आणि संघाला नेहमी प्राधान्य दिले.”
दरम्यान, एमएस धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला, असे आपण म्हणून शकतो. कारण त्याच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. 2007 साली टी-20 विश्वचषक, 2011 साली मायदेशातील वनडे विश्वचषक आणि 2013 साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीने संघाला जिंकवून दिली. 2013 नंतर मागच्या 10 वर्षात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाहीये. असे असले तरी, यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात होणार असल्यामुळे रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारत पुन्हा एकदा विश्वचषक जिंकेल, अशा आशा चाहत्यांना आहे. (Gautam Gambhir praised MS Dhoni)
महत्वाच्या बातम्या –
भारताने जिंकला Asia Cup, तरीही ICC Rankingsमध्ये पाकिस्तानच टॉपर कसा? घ्या जाणून
इशानने घेतला पंगा, मग विराटनेही दाखवला इंगा; Asia Cup Champion बनल्यानंतर स्टार खेळाडूंचा Video Viral