---Advertisement---

अव्वल स्थानावर तर टीम इंडिया हवी होती; ऑस्ट्रेलिया कशी, महान खेळाडूने…

On: मंगळवार, मे 12, 2020 7:28 PM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने ऑस्ट्रेलिया संघाच्या कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानावर प्रश्न उपस्थित केला आहे. गंभीर म्हणाला की, भारताने गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये फक्त मायदेशात नाही तर भारताबाहेरच्या मैदानावरही विजय मिळवत आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. पण, ऑस्ट्रेलिया संघाचे देशाबाहेरील प्रदर्शन निराशादायक होते. Gautam Gambhir questioned about australia team’s test rank.

स्टार स्पोर्ट्सवरील शोमध्ये बोलताना गंभीरने सांगितले की, “जर तुम्ही सगळ्या देशातील प्रभावाच्या दृष्टीने पाहिले, तर भारताने बाहेरच्या देशात बऱ्याच मालिका गमावल्या आहेत. पण ते ऑस्ट्रेलियामध्ये जिंकले आहेत. अधिकतर संघाना आपल्या देशाबाहेरील सामने जिंकण्यास अपयश येते. पण, भारतीय संघ हा नेहमी प्रतिस्पर्धी संघ राहिला आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकामधील कसोटी सामना जिंकला. इंग्लंडमध्येही त्यांनी कसोटीत विजय मिळवला आहे.”

“माझ्या मते भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असायला हवे होते. मला शंका आहे की, ऑस्ट्रेलिया संघाला कोणत्या आधारावर प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. त्यांचे देशाबाहेरील विशेषत भारतीय उपखंडावरील प्रदर्शन वाईट आहे, असेही गंभीर पुढे म्हणाला”

यावर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर नोव्हेंबर २०२०पासून ते जानेवारी २०२१पर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयपुढे ही कसोटी मालिका ५ सामन्यांची करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

कोरोना व्हायरसमुळे या दौऱ्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. पण, बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांविना सामने घेण्याच्या निर्णयाला होकार दिला आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, जर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला, तर त्यांना तिथे १४ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात यावे.

ट्रेंडिंग घडामोडी-

न सांगता संघाबाहेर काढलेला खेळाडू म्हणतो, सचिनबरोबर फलंदाजी करणे म्हणजे…

एकेवेळी भारताचा कॅप्टन कूल असलेल्या धोनीच्या घरी मात्र ‘ही…

भारतीय क्रिकेटपटूंनी स्लेजिंग केलेल्या ५ घटना, ज्याची आजही होते चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---