आशिया चषक 2023 मध्ये श्रेयस अय्यर याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. पण स्पर्धेत एक सामना खेळल्यानंतर त्याची दुखापत पुन्हा उद्भवली. अय्यर 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला आणि पुन्हा संघातून बाहेर झाला. दुखापतीमुळे त्याने आशिया चषकातून माघार घेतलीच. पण भारताचा माजी दिग्गज गौतम गंभीर याच्या मते आगामी वनडे विश्वचषकात देखील अय्यरला खेळण्याची संधी मिळू शकत नाही. या सर्वासाठी गंभीरने एनसीए आणि बीसीसीआयला जबाबदार ठरवले.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यावर्षी मार्च महिन्यात मायदेसात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखापतग्रस्त झाला. या मालिकेदरम्यान, अय्यरच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे त्याने संघातून माघार घेतला. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला सह महिन्यांच्या आसपास वेळ लागला. दरम्यानच्या काळात त्याच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली आणि त्याने बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब देखील पूर्ण केले. हे सर्व करून देखील अय्यर आशिया चषकात दोन सामन्यांमध्ये भाग घेतल्यानंतर पुन्हा दुखापतग्रस्त झाला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 14 धावांची खेळी केली, तर नेपाळविरुद्ध पावसामुळे त्याला फलंदाजी मिळाली नाही. गंभीरच्या मते आगामी वनडे विश्वचषकात संघ व्यवस्थापनाकडून अय्यरसारख्या अनफिट खेळाडूला संधी मिळणार नाही.
“येणाऱ्या वनडे विश्वचषकात अय्यरला संधी मिळेल, असे मला वाटत नाही. त्याच्या जागी दुसरा एखादा खेळाडू विश्वचषक खेळेल. आपण नेहमीच फिट खेळाडूंना घेऊन विश्वचषक खेळतो. प्रदर्शन ही वेगळी गोष्ट आहे. विश्वचषकात त्या खेळाडूला अशा प्रकारे स्नायूंमध्ये तान आला, तर ऐन वेळी संघाला बदली खेळाडू मिळणार नाही. त्यामुळे अय्यर जर फिट नसेल, तर विश्वचषकात खेळणे त्याच्यासाठी कठीण अशेल. सोबतच त्याच्या फॉर्मचा प्रश्न देखील आहे. जो ज्या फॉर्ममध्ये होता, त्याला 7-8 महिने झाले. त्यानंतर अय्यर फक्त एक सामना खेळला आहे.”
अय्यरच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना त्याच्या जागी योग्य पर्यायी खेळाडून निवडावा लागणार आहे. गंभीरने या सर्वासाठी एनसीला जबाबदार धरले. “अशात जर प्रश्न उपस्थित होत असतील, तर हे प्रश्न एनसीएला विचारले गेले पाहिजेत. कारण अय्यरने दरम्यानचे सर्व महिने याच ठिकाणी घालवले आहेत, तसेच एनसीएकडूनच त्याला खेळण्याची परवानगी दिली गेली होती. कुणाला माहीत, त्याला घाईमध्ये लवकर परवानगी दिली गेली असेल?” दरम्यान, श्रेयस अय्यर आशिया चषकात भारतासाठी जास्त योगदान देऊ शकला नाही. पण भारताने तरीही आशिया चषक 2023 आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यात रविवारी (17 सप्टेंबर) भारताने श्रीलंकेला 10 विकेट्सने मात दिली आणि आठवी आशिया चषक ट्रॉफी उंचावली. (Gautam Gambhir questioned the role of BCCI and NCA due to Shreyas Iyer’s injury)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाला 440 व्होल्टचा झटका! संघाचा हुकमी एक्का Injured, लगेच वाचा
भारताने जिंकला Asia Cup, तरीही ICC Rankingsमध्ये पाकिस्तानच टॉपर कसा? घ्या जाणून