आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. चॅम्पियन्स ट्राॅफीची सुरूवात (19 फेब्रुवारी) होणार आहे. दरम्यान भारतीय संघ (20 फेब्रुवारी) रोजी या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. तत्पूर्वी भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) दोन्ही खेळाडूंच्या फाॅर्मबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडच्या काळात कोहली आणि रोहितच्या खराब फॉर्ममुळे त्यांच्या भविष्याबद्दलच्या अटकळांना उधाण आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार सोहळ्यादरम्यान गंभीर म्हणाला, “मला वाटते की रोहित आणि विराट दोघेही ड्रेसिंग रूमसाठी खूप महत्वाचे आहेत. ते भारतीय क्रिकेटसाठी खूप मौल्यवान आहेत. त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठी भूमिका बजावावी लागेल.”
पुढे बोलताना गंभीर म्हणाले, “मी आधीही सांगितले आहे की हे खेळाडू धावा करण्यासाठी भुकेले आहेत. त्यांना देशासाठी खेळायचे आहे. त्याला देशासाठी खेळण्याची आणि देशासाठी चांगली कामगिरी करण्याची आवड आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघ एका क्षणासाठीही आराम करू शकत नाही. कारण 50 षटकांच्या विश्वचषकाच्या तुलनेत या स्पर्धेत त्यांचे फक्त तीन साखळी सामने आहेत.”
शेवटी बोलताना गंभीर म्हणाले “चॅम्पियन्स ट्रॉफी हे 20 षटकांच्या विश्वचषकापेक्षा पूर्णपणे वेगळे आव्हान आहे कारण जवळजवळ प्रत्येक सामना करा किंवा मरो असा असतो त्यामुळे तुम्ही या स्पर्धेत कुठेही थांबू शकत नाही. म्हणून आशा आहे की आपण खरोखर चांगली सुरुवात करू. कारण शेवटी जर तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल, तर तुम्हाला पाच सामने जिंकावे लागतील,”
Gautam Gambhir said, “”for me, both Rohit Sharma and Virat Kohli bring so much value to the dressing room and add so much value to Indian cricket as well. I’m sure both those guys, along with the rest of the team, will be absolutely hungry”. pic.twitter.com/wCKYZuUxdg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 1, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
शाब्बास..! स्मृती मानधनानं घडवला इतिहास, चौथ्यांदा जिंकला बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार
निवृत्तीच्या 12 वर्षांनंतरही सचिनचा विशेष सन्मान, क्रिकेटच्या देवाला मिळाला हा पुरस्कार
बुम-बुमचा दबदबा; आयसीसीनंतर बीसीसीआयने देखील केला विशेष सन्मान….