टी20 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. विजेतेपदाचे दावेदार असताना अशारीतीने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर टीका होतेय. या पराभवामुळे भारतीय संघाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले आहे. भारताच्या पराभवानंतर माजी सलामीवीर व समालोचक गौतम गंभीर याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याची आठवण काढत कौतुक केले.
तब्बल 15 वर्षानंतर भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकण्याची संधी होती. तर, 2013 चॅम्पियन ट्रॉफीपासून सुरू असलेला आयसीसी विजेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक होता. मात्र, उपांत्य फेरीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी वर्षभर वाट पहावी लागणार आहे. भारताच्या या पराभवानंतर बोलताना गौतम गंभीर म्हणाला,
“हा पराभव निराश करणारा आहे. यावेळी सर्वांना विजयाची अपेक्षा होती. आपल्याला आयसीसी ट्रॉफी उंचावण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. मला असे वाटते की, एमएस धोनीप्रमाणे कोणताही कर्णधार तीन वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी जिंकू शकणार नाही.”
एमएस धोनी याला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. जवळपास 9 वर्ष त्याने संघाचे नेतृत्व करताना खेळाच्या तीनही प्रकारात संघाला अव्वलस्थानी नेले. यासोबतच भारताने 2007 मध्ये पहिला टी20 विश्वचषक आपल्या नावे केला. त्यानंतर चार वर्षांने 2011 मध्ये तब्बल 28 वर्षांचा दुष्काळ संपवत त्याच्याच नेतृत्वात भारताने वनडे विश्वचषक उंचावला होता. तर 2013 मध्ये इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पियन ट्रॉफी भारताने जिंकलेली. त्यानंतर भारतीय संघ कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या टी20 स्पर्धांमध्ये भारताचे अपयश पाहून दिग्गज खेळाडूने दिला सल्ला; म्हणाला, ‘आता द्रविडला…’
‘बिलियन डॉलर इंडस्ट्रीचा संघ मागेच राहिला अन् आम्ही…’, पीसीबी अध्यक्षांनी भारताच्या जखमेवर चोळलं मीठ