---Advertisement---

‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी

On: बुधवार, जून 17, 2020 12:02 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाची फलंदाजी सरासरी कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये ५०पेक्षा जास्त आहे. कोणत्याही फलंदाजाला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एवढी चांगली फलंदाजी सरासरी टिकवून ठेवणे खूप अवघड असते.

नुकताच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर विराटचे सातत्य, प्रबळ मानसिकता आणि त्याच्या शैलीविषयी बोलला होता. दरम्यान त्याने हिटमॅन रोहित शर्मामधील एक कमतरता सांगितली आणि त्या कमतरेमुळेच विराट रोहितपेक्षा उत्कृष्ट असल्याचे, गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड शोमध्ये म्हटले आहे.

गंभीरला वाटते की, विराटची स्ट्राईक रोटेट करण्याची क्षमता वेगवेगळ्या परिस्थितीत त्याला उपयोगाला पडते. रोहितसोबत तुलना करताना गंभीर म्हणाला की, “ज्याप्रमाणे विराट स्ट्ईक रोटेट करतो, त्याप्रमाणे रोहित करु शकत नाही. विराटची हीच गोष्ट त्याला रोहितपेक्षा उत्कृष्ट बनवते. रोहितमध्ये मोठे शॉट्स मारण्याची क्षमता आहे, त्यामुळे त्याची विराटसोबत तुलना करणे योग्य ठरते. याबरोबरच ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्समध्येही फिरकी चेंडूला स्ट्राईक रोटेट करण्याची क्षमता नाही. त्यामुळे विराट सर्वांपेक्षा जास्त यशस्वी आहे.”

गंभीरव्यतिरिक्त भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाननेही विराटची प्रशंसा केली आहे. इरफान म्हणाला की, “एका गोलंदाजाला विराटविरुद्ध योजना आखणे खूप कठीण काम आहे. कारण, तो एक धाव घेतो आणि नॉन स्ट्राईकर बाजूला जातो. तो एक विशेष व्यक्ति आहे. तो फक्त लेग साइडवर स्ट्राईक रोटेट करत नाही, तर आपल्या मनगटाच्या मदतीने चांगल्या चेंडूलाही थर्ड मॅनच्या भागात पाठवू शकतो आणि एक धाव घेऊ शकतो.”

ट्रेंडिंग घडामोडी-

टी२० विश्वचषकात टीम इंडियाकडून फायनल की आयपीएलमध्ये मुंबईकडून फायनल?…

ते दोन चांगले निर्णय झाले नसते तर जगाला दोन दिग्गज सलामीवीर मिळाले…

मी कुणाच्या सांगण्यावरुन क्रिकेट खेळत नाही; निवृत्ती कधी घ्यायची हे मी…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---