बीसीसीआयने मागील काही महिन्यापासून खेळाडूंसाठी यो-यो टेस्ट अनिवार्य केली आहे. त्यामुळे ही टेस्ट यशस्वी पार केली तरच खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले जाते.
यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या यो-यो टेस्ट हा विषय चांगलाच चर्चेत आहे. यात भारताचा फलंदाज गौतम गंभीरनेही आता सहभाग घेतला आहे.
त्याने सोशल मिडियावर त्याची मोठी मुलगी अझीनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती खेळाडूंना यो-यो टेस्ट देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरती करत आहे. या व्हिडिओला गंभीरने ‘माझी मोठी मुलगी अझीनने यो-यो टेस्ट यशस्वी पार केली’ असे कॅप्शन दिले आहे.
त्याचबरोबर त्याने युवराज सिंग, सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगला ट्विटरवर टॅग करत तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न विचारला आहे.
Looks like my elder one Aazeen has cleared the Yo-Yo test!!! What do you think @YUVSTRONG12 @harbhajan_singh @sachin_rt ? pic.twitter.com/rP4KIkRDrs
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) July 22, 2018
बीसीसीआयने संघात स्थान मिळवण्यासाठी सक्तीच्या केलेल्या या फिटनेस टेस्टमध्ये अयशस्वी झाल्याने सुरेश रैना, युवराज सिंग, मोहम्मद शमी, अंबाती रायडू, संजू सॅमसन अशा खेळाडूंना याचा याआधी फटका बसला आहे.
तसेच नुकतेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही संघ निवडीसाठी यो-यो टेस्ट हा एकमेव निकष असू शकत नाही असे म्हटले आहे. तर काही क्रिकेट तज्ञांनी यो-यो टेस्टला पाठिंबा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–भुवनेश्वर कुमार नसला तरी भारतीय संघाला फरक पडणार नाही- झहीर खान
–एमएस धोनीचा हा निर्णय ऐकूण तुम्ही व्हाल थक्क