भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धा खेळत आहे. सोमवारी (4 सप्टेंबर) भारत विरुद्ध नेपाळ असा सामना कॅण्डी येथे खेळला गेला. मात्र, सामन्यादरम्यान एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामुळे भारतीय क्रिकेटवर्तुळात खळबळ माजली. भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक गौतम गंभीर हा काही प्रेक्षकांना मिडल फिंगर दाखवताना दिसलेला. आता या घटनेवर त्याने स्पष्टीकरण दिले आहे.
आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी (2 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने आले होते. गौतम गंभीर या सामन्यात समालोचकाची भूमिका पार पाडत होता. सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे काही वेळासाठी खेळ थांबवला गेला होता. यादरम्यानच गंभीर स्टॅन्डमधून जाताना दिसला. गंभीरला पाहताच प्रेक्षकांमधून विराट-विराट असा आवाज येऊ लागला. गंभीरच्या हे लक्षात येताच त्याने आवाज करणाऱ्या प्रेक्षकांना मीडल फिंगर दाखवली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आयपीएल दरम्यान या दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. त्यामुळे विराटचे चाहते गंभीरला ट्रोल करत होते.
आता या घटनेवर गंभीरने प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार,
“व्हिडिओमध्ये ज्याप्रकारे दिसत आहे त्याच्या परिस्थिती काहीशी वेगळी होती. तिथे काही पाकिस्तानी लोक होते जे भारत देशाविरोधात घोषणा देत होते. काहींनी हिंदुस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. आपल्या देशाविरोधात कोणी काही बोलले तर, प्रतिक्रिया नक्कीच दिली जाईल. सोशल मीडियावर जे दाखवले जाते ते सर्व सत्य नसते.”
Gambhir said "The crowd was shouting anti India slogs, as an indian, I can't take anyone saying this about my country hence reacted this way – what you see on social media isn't always the correct picture". [about the middle finger viral video – Sports Tak] pic.twitter.com/awruhKnwME
— Johns. (@CricCrazyJohns) September 4, 2023
Gautam Gambhir said, "whatever is shown on social media cannot be true. The crowd was chanting anti India slogans". pic.twitter.com/hCw4y1qdtH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2023
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट विराट असा मोठ्याने आवाज झाल्यानंतर गंभीरने ही प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता त्याने खुलासा केल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. (Gautam Gambhir Speaks On Middle Finger Scandal At Asia Cup)
महत्वाच्या बातम्या –
नेपाळकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई! सुपर फोरसाठी भारतापुढे ठेवले मोठे लक्ष्य
बीसीसीआय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पाकिस्तानमध्ये दाखल, खास सामन्यासाठी लावणार स्टेडियममध्ये उपस्थिती