---Advertisement---

“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29वा सामना खेळला जात आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे पार पडतोय. सामन्याची नाणेफेक इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने शानदार अर्धशतक झळकावत भारतीय संघाचा डाव सावरला. त्याचवेळी यादरम्यान समालोचन करत असताना भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने एक मोठे विधान केले आहे.

या विश्वचषकात रोहित कमालीचा फॉर्ममध्ये दिसून आला आहे. पहिल्या पहिल्या सामन्यात खाते खोलण्यात त्याला अपयश आले होते. मात्र, त्यानंतर त्याने चांगला फॉर्म पकडत एक शतक व एक अर्धशतक झळकावले. तसेच दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे 48 व 46 धावा केल्या. या सामन्यात त्याच्या बॅटमधून 87 धावांची खेळी आली. त्यावेळी बोलताना गंभीर म्हणाला,

“रोहित शर्मा हा अत्यंत निस्वार्थी खेळाडू आहे. तो नेहमीच संघाला सर्वात पुढे ठेवतो. त्याच्या नावे आत्ता वनडेमध्ये नक्कीच 40-45 शतके असती. मात्र तो शतकांचा भुकेला नाही.”

सध्या भारतीय संघाचा वरिष्ठ खेळाडू विराट कोहली याच्या नावे 48 वनडे शतके असून, तो सचिन तेंडुलकर यांच्या 49 वनडे शतकांच्या अगदी जवळ आहे. तो या विश्वचषकातच हा विक्रम मोडीत काढण्याची शक्यता अनेक जण व्यक्त करत आहेत.

(Gautam Gambhir Speaks On Rohit Sharma Less ODI Century In ODI)

हेही वाचा-
झहीर टॉपला असलेल्या यादीत विराट पाचव्या क्रमांकावर, नकोशा विक्रमात सचिनला टाकले मागे
विश्वचषक 2023मध्ये भारत पहिल्यांदाच करणार ‘हे’ काम, इंग्लंडने जिंकला टॉस; Playing XIमध्ये नाही कोणताच बदल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---