---Advertisement---

झहीर टॉपला असलेल्या यादीत विराट पाचव्या क्रमांकावर, नकोशा विक्रमात सचिनला टाकले मागे

Virat Kohli
---Advertisement---

वनडे विश्वचषकात विराट कोहली जबरदस्त प्रदर्शन करत आहे. मात्र, रविवारी (29 ऑक्टोबर) त्याने शुन्यावर विकेट गमावली आणि संघ चांगलाच अडचणीत आला. गतविजेता इंग्लंड आणि भारतीय संघ लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आमने सामने होते. शुन्यावर बाद होणाऱ्या विराटने एका नकोशा विक्रमात माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याला मागे टाकले.

भारत आणि इंग्लंड () यांच्यातील हा सामना लखनऊच्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. याठिकाणची खेळपट्टी फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. भारताने आपल्या सुरुवातीच्या तीन विकेट्स स्वस्तात गमावल्या. सलामीवीर शुबमन गिल 9 धावा करून बाद जाला. तर विराट कोहली (Virat Kohli) 9 चेंडू खेळून 0 धावांवर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली शुन्यावर बाद होण्याची ही 34वी वेळ आहे. त्याने सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला मागे टाकले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणाऱ्या भारतीयांच्या यादीत झहीर खान पहिल्या क्रमांकावर आहे. एकूण 43 वेळा झहीर शुन्यावर बाद झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इशांत शर्मा यानेही 40 वेळा शुन्यावर विकेट गमावली. 37 वेळा शुन्यावर बाद होणारा हरभजन सिंग यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून अनिल कुंबळे (35) चौथ्या क्रमांकावर आहेत. पाचवा क्रमांक विराट कोहलीने मिळवला असून सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या सचिन तेंडुलकरने 34 वेळा शुन्यावर विकेट गमावली आहे. (Virat Kohli has become the fifth Indian to be dismissed Most times on duck)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारे भारतीय (डाव)
43 – झहीर खान (227)
40 – इशांत शर्मा (173)
37 – हरभजन सिंग (284)
35 – अनिल कुंबळे (307)
34 – विराट कोहली (569)*
34 – सचिन तेंडुलकर (782)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड

महत्वाच्या बातम्या – 
विश्वचषक 2023मध्ये भारत पहिल्यांदाच करणार ‘हे’ काम, इंग्लंडने जिंकला टॉस; Playing XIमध्ये नाही कोणताच बदल
शादाब खानबद्दल पाकिस्तानी माजी गोलंदाजाचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘तो मुद्दाम…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---