दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा फिरकी अष्टपैलू गोलंदाज शादाब खानला दुखापत झाली आणि त्याच्या जागी उसामा मीरने बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी केली. यातच, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलचे असे मत आहे की, शादाब खानला दुखापत झाली नव्हती, उलट संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी त्याच्यावर टाकली जाऊ नये म्हणून तो दुखापतीचे कारण बनवत होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शादाब खान (Shadab Khan) याला खेळवण्यात आले आणि उसामा मीरला वगळण्यात आले होते. या सामन्यात शादाब खानने चांगली फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. मात्र, क्षेत्ररक्षण करताना तो दुखापतीचा बळी ठरला. यानंतर, सामन्यात शादाब खानला गोलंदाजी करता येणार नाही अशी बातमी आली आणि उसामा मीरला त्याच्या स्थानी बदली खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले. या सामन्यात उसामा मीर (Usama Mir) याने चांगली गोलंदाजी केली पण तरीही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
उमर गुल (Umar Gul) याचं असं म्हणनं आहे की, शादाब खान दुखापत झाल्याचे कारण देत होता. एआरवाय न्यूजवर बोलताना तो म्हणाला, “आमचा विश्वचषक प्रवास इथेच संपला. शादाब खानबद्दल बोलायचं झालं तर, आम्हाला माहित नाही की, त्याला कोणत्या प्रकारची दुखापत झाली आहे. जेव्हा तुम्ही जाऊन पडाल आणि चक्कर आल्याचे निमित्त कराल, तेव्हा नक्कीच प्रश्न निर्माण होतील. तू संघातून पळून गेलास. मात्र, सामना पाकिस्तानच्या बाजूने गेल्याचे समजताच तू डगआऊटवर येऊन जल्लोष करण्यास सुरुवात केली. यावरून त्याने सबबी सांगून वाचण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध होते. मग लोक नक्कीच प्रश्न उपस्थित करतील. हा एक महत्त्वाचा सामना होता आणि सीनियर असल्याने तु खेळायला हवे होते. अनेक खेळाडू तुटलेल्या हातानेही खेळले आहेत.”
या विश्वचषकात पाकिस्तान संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यातील 4 सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याच्या त्यांच्या आशा जवळपास मावळलेल्या दिसत आहेत. (Former Pakistan fast bowler big revelation about Shadab Khan Said He deliberately)
म्हत्वाच्या बातम्या
हारलेल्या सामन्यातही न्यूझीलंडने घडवला इतिहास! विश्वचषकात ‘असा’ जबरदस्त पराक्रम करणारा पहिलाच संघ
‘बाबरचा फोन उचलत नाही PCB अध्यक्ष…’, पाकिस्तानी माजी कर्णधाराचा खळबळजनक दावा