रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअमवर दोन बलाढ्य संघ एकमेकांना भिडणार आहेत. ते दोन संघ इतर कुठले नसून भारत विरुद्ध इंग्लंड आहेत. हा विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29वा सामना असणार आहे. अशात या सामन्यापूर्वी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने मोठे विधान केले आहे. त्याने विश्वचषकात हार्दिक पंड्या येईपर्यंत संघाला सूर्यकुमार यादव याच्यावर विश्वास असल्याचे म्हटले आहे.
केएल राहुल (KL Rahul) म्हणाला की, आपल्या सर्वांना माहिती आहे की, सूर्या काय करू शकतो. सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना राहुल म्हणाला, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) नसणे भारतीय संघासाठी मोठी कमतरता आहे. खरं तर, 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना पंड्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती.
काय म्हणाला राहुल?
माध्यमांशी बोलताना राहुल म्हणाला, “हार्दिक पंड्या संघासाठी महत्त्वपूर्ण सदस्य राहिला आहे. तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे त्याचे नसणे संघासाठी एक कमतरता आहे. मात्र, जे काही झाले, ते दुर्देवी आहे.”
पुढे बोलताना राहुल म्हणाला की, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला कदाचित इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. सूर्याने न्यूझीलंडविरुद्ध वनडे विश्वचषकात पदार्पण केले. मात्र, त्याला दुर्दैवीरीत्या धावबाद व्हावे लागले होते. तो 1 धावेवर तंबूत परतला होता.
सूर्यकुमारवर संघाला विश्वास
“आम्हालाही काही बाबतीत वर्तमानाकडे लक्ष द्यावे लागेल की, तो या सामन्यासाठी उपलब्ध नाहीये. सूर्याला कदाचित संधी मिळेल आणि आम्हाला माहिती आहे की, सूर्या काय करू शकतो. त्यामुळे हार्दिक परत येईपर्यंत आमचा सूर्यावर विश्वास आहे.”
भारतीय संघ स्पर्धेत मजबूत स्थितीत
भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत दमदार प्रदर्शन केले आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. अशात भारताकडे विजयी षटकार मारण्याची संधी आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पंड्याच्या अनुपस्थितीत कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (world cup 2023 batter kl rahul statement on suryakumar yadav and hardik pandya ind vs eng)
हेही वाचा-
‘हे कठीण असेल, पण आमचे ध्येय…’, बांगलादेशच्या नांग्या ठेचल्यानंतर नेदरलँड्सच्या कॅप्टनचे मोठे विधान
अर्रर्र! विजय मिळवूनही ऑस्ट्रेलियाला हलवता आले नाही न्यूझीलंडचे सिंहासन, पण का? पाहा Points Table