क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमध्ये वाद होणे नवे नाही. इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली यांना त्यांच्या आक्रमक अंदाजासाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानावर नेहमी हे खेळाडू आक्रमक भूमिकेत दिसले आहेत. याच आक्रमक स्वभावामुळे २०१३ मध्ये हे दोन्ही खेळाडी एकमेकांसोबत भिडले होते.
त्यावेळी त्यांच्यातील या वादाची भरपूर चर्चाही झाली होती. आता गंभीरने (Gautam Gambhir) या विवादावर प्रतिक्रिया (Gautam Gambhir On 2013 Controversy) दिली आहे. कर्णधाराच्या भूमिकेत असताना इच्छा नसतानाही तुम्हाला असेल करावे लागते, असे गंभीरने म्हटले आहे.
जतिन सप्रूच्या यूट्यूब शो, ‘ओव्हर एंड आऊट’वर बोलताना गंभीर (Gautam Gambhir Statement On Virat Kohli) म्हणाला की, “हे ठीक आहे, मी त्याच्याशी पूर्णपणे ठिक आहे आणि मला अपेक्षा होता की, विराट असाच असेल. मला ही स्पर्धा आवडते आणि मला त्यातील प्रतिस्पर्धी लोकही आवडतात. एमएस धोनी त्याच्यापद्धतीने एक प्रतिस्पर्धी आहे आणि विराट त्याच्यापद्धतीने. जेव्हा तुम्ही एखाद्या संघाचे नेतृत्त्व करता, तेव्हा तुम्हाला असे करावे लागते. भलेही तुम्हाला असे करण्याची इच्छा नसली, तरीही आपला संघ आपल्या इच्छेनुसार खेळावा त्यासाठी असे करावे लागते.”
पुढे बोलताना गंभीर म्हणाला की, “एका नेत्याच्या रूपात कधी-कधी तुम्ही याबद्दल विचार करत नसता की, दुसऱ्या व्यक्तीसोबत आपले वैयक्तिक संबंध कसे आहेत. कारण त्यावेळी तुम्ही संघाचे नेतृत्त्व करत असता. म्हणून तुम्हाला तसे करावे लागते. पण मैदानात असताना खेळाडूंमध्ये घडलेल्या कोणत्याही गोष्टी वैयक्तिक नसतात. त्यावेळी विराविरोधातही माझा कोणता वैयक्तिक त्रागा नव्हता. मी सतत सांदत असतो की, विराटने जे काही यश प्राप्त केले आहे, त्यामुळे मी अजिबात चकित नाही. कारण तो सुरुवातीपासूनच खूप जबरदस्त खेळाडू राहिला आहे. त्याने फिटनेस आणि त्याच्या कौशल्यात जे बदल केले आहेत, ते जबरदस्त आहेत.”
काय होता विराट-गंभीरमधील २०१३ चा (Gambhir & Kohli Controversy) वाद?
२०१३ साली बेंगलोर विरुद्ध कोलकाता यांच्यात झालेल्या एका सामन्यादरम्यान लक्ष्मिपथी बालाजीने कोहलीला बाद केले होते. त्यानंतर हे दोन्ही खेळाडू, विराट आणि गंभीर मैदानावरच एकमेकांशी भिडले होते. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलची खरी रनमशीन आहे ‘हा’ कर्णधार; धोनी, रोहित, वॉर्नरलाही सोडलंय मागे