नुकतेच भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात टी20 मालिका पार पडली. या मालिकेत दोन्ही संघांच्या काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या मालिकेआधी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या हंगामाचा लिलाव कोचिमध्ये पार पडला. यामध्ये अनेक मोठे खेळाडू अनसोल्ड राहिले. ज्यामध्ये श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याचा समावेश आहे. त्याच्याशी संबंधित मोठे विधान गौतम गंभीरने केले आहे.
दसून शनाका (Dasun Shanaka) याने या मालिकेत तीन सामन्यात एकूण 124 धावा केल्या. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थातच सूर्यकुमार यादव आहे. त्याने 170 धावा केल्या आहेत. शनाकाने पुण्यात झालेल्या दुसऱ्या टी20मध्ये 20 चेंडूतच अर्धशतक केले होते. ते श्रीलंकेकडून टी20मधील सर्वात जलद अर्धशतक ठरले.
शनाकाची ही स्फोटक फलंदाजी पाहून भारताचा माजी सलामीवीर आणि आयपीएल लखनऊ सुपर जायंट्स फ्रॅंचायजीचा मेंटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला, “जर आयपीएलचा लिलाव या मालिकेनंतर झाला असता तर शनाका निश्चितच महागडा खेळाडू ठरला असता.”
गंभीर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, “शनाकाने ज्याप्रकारे फलंदाजी केली ती पाहून माझ्याकडे त्याला घेण्यासाठी पैसेच वाचले नसते. तो आयपीएलमध्ये मोठ्या किंमतीला विकला गेला असता. विचार करा ही मालिका आयपीएलआधी झाली असती तर काही फ्रॅंचायजींकडे त्याला विकत घेण्यासाठी पैसेच कमी पडले असते.”
गंभीरचे हे वाक्य किती बरोबर याच शंका आहे. कारण शनाकाने भारताविरुद्ध मागील 6 टी20 डावांमध्ये 47* (19), 74* (38), 33* (18), 45 (27), 56* (22) आणि 23 (17) अशा धावा केल्या आहेत. यातील पहिल्या तीन खेळी तर त्याने आयपीएल लिलावाआधीच केलेल्या होत्या तरी त्याच्यामध्ये एकाही आयपीएल फ्रॅंचायजींनी रुची दाखवली नाही.
लखनऊ लिलावात 23 कोटी रुपये घेऊन उतरला होता. यामध्ये त्यांनी 10 खेळाडू खरेदी केले. ज्यामध्ये त्यांनी निकोलस पूरन याला 16 कोटी रुपये खर्च करत संघात घेतले. तो त्यांच्यासाठी त्या लिलावातील महागडा खेळाडू ठरला. नंतर त्यांनी डॅनल सॅम्स (75 लाख), जयदेव उनाडकट (50 लाख) आणि रोमारियो शेफर्ड (50) यांना खरेदी केले. (Gautam Gambhir statement on Dasun Shanaka who unsold in IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
AUSvSA: सिडनी कसोटी अनिर्णीत राहिल्याचा भारताला फायदा, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेचे मात्र नुकसान
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा: ट्रायथलॉनमध्ये नागपूरच्या जोशी भगिनींचे वर्चस्व