भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला मंगळवारी (10 जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक पूर्ण केले. या शतकानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचवेळी अनेक जण सचिन तेंडुलकर याच्याशी त्याची तुलना देखील करत आहेत. मात्र, याच तुलनेमुळे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर संतापला आहे.
विराट कोहली याने या वर्षातील आपला पहिला सामना खेळताना आपली जुनी झलक दाखवून दिले. श्रीलंकन गोलंदाजांवर एकहाती वर्चस्व गाजवताना त्याने, आपले 73 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. विराटने या सामन्यात केवळ 87 चेंडूंचा सामना करताना 113 धावांची अफलातून खेळी केली. यामध्ये 11 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
त्याच्या या शतकानंतर प्रसारण वाहिनीवर बोलताना अँकर जतीन सप्रू याने विराट आणि सचिन यांच्या तुलनेचा मुद्दा छेडला. त्यावेळी समीक्षक म्हणून बसलेल्या गौतम गंभीरने त्यावर काहीसा आक्षेप नोंदवला. गंभीर म्हणाला,
“विराट महान खेळाडू आहे यात काहीच शंका नाही. मात्र, दरवेळी त्याची सचिनशी बरोबरी करणे योग्य नाही. सचिन ज्या कालावधीत खेळला त्यावेळी नियम काहीसे वेगळे होते. त्यावेळी पाच क्षेत्ररक्षक हे सर्कलमध्ये नव्हते. विराट आणि सचिन यांचा खेळाचा दर्जा नक्कीच एक सारखा आहे.”
क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर याच्याकडे पाहिले जाते. सचिनने आपल्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली. यामध्ये 51 कसोटी व 49 वनडे शतकांचा समावेश आहे.
(Gautam Gambhir Statement On Virat Kohli And Sachin Tendulkar Comparison)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेत कोहलीच विराट! श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढत ठोकले 45 वे वनडे शतक
गिलने टीकाकरांना केले शांत! चौकारांचा पाऊस पाडत ‘या’ यादीत श्रेयस, विराटला टाकले मागे






