इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी याच्याविषयी मोठे विधान पुढे आले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने हे विधान केले आहे. जर, नबी हैद्राबादऐवजी दूसऱ्या कोणत्या आयपीएल संघाचा भाग असता, तर त्याने हंगामातील पूर्ण १४ सामने खेळले असते, असे गंभीरने म्हटले आहे. Gautam Gambhir Talks About Sunrisers Hydrabad Mohammad Nabi
स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला की, “माझ्या मते, नबी हा टी२० क्रिकेटमधील सर्वात अधोरेखित खेळाडू आहे. जेवढी कायरन पोलार्ड, एबी डिविलियर्स, राशिद खान आणि डेव्हिड वॉर्नर या परदेशी खेळाडूंची चर्चा होते, तेवढी मोहम्मद नबीची होत नाही. तो एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. तसेच, तो ४ षटके गोलंदाजी करू शकतो. सोबतच ५व्या किंवा ६व्या क्रमांकावर फलंदाजी करताना मोठ-मोठे शॉट्सदेखील मारतो.”
“आपण, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून आंद्रे रसलचे नाव घेतो. पण नबीदेखील रसलच्या जास्त मागे नाही. तो जास्त क्रिकेट न खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळाडू आहे, म्हणून लोक त्याला जास्त महत्त्व देत नाहीत,” असे त्याने पुढे बोलताना म्हटले आहे.
तसेच, सनराइजर्स हैद्राबाद संघाविषयी बोलताना गंभीर म्हणाला की, “नबी अशा संघाचा भाग आहे, ज्यामध्ये वॉर्नर, राशिद, जॉनी बेयरस्टो, आणि केन विलियम्सन यांच्यासारखे परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे नबीला जास्त संधी मिळत नाही. जर तो आयपीएलच्या दूसऱ्या संघाचा भाग असता, तर त्याला हंगामातील सर्व १४ सामने खेळायला मिळाले असते. जेव्हा तो पूर्ण हंगामात खेळेल, तेव्हा सर्वांना त्याची किंमत कळेल.”
नबी हा २०१७ पासून आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा भाग आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत नबीने आयपीएलमध्ये केवळ १३ सामने खेळले आहेत. त्यातही त्याला १० डावात फलंदाजी करायला मिळाली आहे. अशातही त्याने १३५ धावा आणि ११ विकेट्सची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीचा कर्णधार विराटने ‘या’ गोष्टीवर आधीपासूनच लक्ष दिले असते तर आज…
ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात आज दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही…
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच तुम्हाला तुमची चुक कळेल,’ भारतीय दिग्गजाने साधला थेट बोर्डावर निशाणा
ट्रेंडिंग लेख-
दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार
इरफानला एकाच ओव्हरमध्ये २४धावा कुटणारा ‘ज्युनियर सेहवाग’ आयपीएल गाजवायला सज्ज