---Advertisement---

‘त्याच्या जागी रहाणे किंवा रोहित असता तर?…’ माजी दिग्गजाने थेट भारताच्या निवडसमितीवरच उचलले सवाल

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 1:13 PM
Ajinkya-Rahane-Shardul-Thakur-Rohit-Sharma
---Advertisement---

आशिया चषक 2022 भारतीय संघासाठी खूपच निराशाजनक होता. सुपर4 फेरीतच दोन महत्त्वाचे सामने गमावून संघ बाहेर पडला. मात्र, संपूर्ण स्पर्धेत अनुभवी फलंदाज विराट कोहलीची बॅट जोरदार धावा करत राहिली. त्याने संघासाठी पाच सामन्यांच्या पाच डावात 92.00 च्या सरासरीने 276 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटने एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली.

भारतीय दिग्गज फॉर्ममध्ये परतल्याने सर्वजण आनंदी आहेत. मात्र, संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचे मत वेगळे आहे. तो म्हणाला की, “विराट कोहलीलाच इतके दिवस संघात संधी मिळाली, तीही क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये. सध्या किती मोठी नावे आहेत? त्यांच्या जागी अश्विन, रहाणे किंवा रोहित शर्मा असते तर त्यांना संघातून वगळले असते.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…म्हणून कोहली सलामीवीर बनू शकत नाही!’ चाहत्यांच्या मागणीला माजी दिग्गजाचं सडेतोड उत्तर
आशिया चषक जिंकणारा संघ होणार मालामाल, कोटींमध्ये मिळणार प्राइज मनी; उपविजेत्यांनाही…
श्रीलंकेच्या कर्णधाराने अंतिम सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड देण्यासाठी बनवलाय ‘हा’ मास्टरप्लॅन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---