भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मतांना निवड समितीने मान्यता दिली नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 साठी निवडकर्त्यांनी बहुतेक युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला होता. फलंदाज चेतेश्वर पुजारासह अनेक अनुभवी खेळाडूंची नावे संघातून गायब होती. गौतम गंभीरला पुजाराचा टीम इंडियात समावेश करायचा होता. पण त्याचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही, असे या अहवालातून समोर आले आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गंभीरला पुजाराला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियात सामील करायचं होतं, पण तसं झालं नाही. पुजाराचा संघात समावेश करण्यासाठी निवडकर्त्यांनी गंभीरचे ऐकले नाही. पर्थमधील मालिकेतील पहिली कसोटी जिंकल्यानंतरही गंभीर पुजाराबद्दल बोलला होता. असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुजाराने टीम इंडियासाठी 100 हून अधिक कसोटी खेळल्या आहेत. 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटची टेस्ट खेळली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात पुजाराने दोन्ही डावात 14 आणि 27 धावा केल्या.
🚨 GAUTAM GAMBHIR WANTED PUJARA IN TEAM INDIA FOR BGT 🚨
– Gautam Gambhir wanted Cheteshwar Pujara in Team India’s Squad for Border Gavaskar Trophy but the selectors shot it down. Even after Perth Test Match, Gambhir was still talking about Pujara. (Express Sports). pic.twitter.com/NZRqas1UyK
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 1, 2025
2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत पुजाराने सर्वाधिक धावा केल्या होत्या. भारतीय फलंदाजाने 1258 चेंडूत 521 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत पुजाराने 271 धावा केल्या होत्या. पंतनंतर या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला होता.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने पुजारा 2024-25 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत नसल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. हेझलवूड म्हणाला, “पुजारा येथे नसल्याचा मला आनंद आहे. तो असा आहे की जो फलंदाजी करतो आणि क्रिझवर बराच वेळ घालवतो. त्याला बाद मोठे आव्हनात्मक काम होते.”
हेही वाचा-
IND vs AUS: “आता खूप झाले….”, गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंवर नाराज
AUS दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर बीसीसीआयच्या रडारावर, अहवालात मोठा खुलासा
2024 मध्ये, फक्त एका भारतीय फलंदाजाने कसोटीत द्विशतक झळकावले, संघासाठी केल्या सर्वाधिक धावा