---Advertisement---

भावा, विराटवर तू एवढा का जळतोस? गंभीरच्या ‘त्या’ विधानांनी नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 5:57 PM
Virat Kohli & Gautam Gambhir
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहेत, मात्र या दोघांची तुलना करत सूर्यकुमार उत्तम खेळला हे विधान केल्याने भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्याने केलेले एक विधान त्याच्यासाठी धोक्याचे ठरले आणि चाहत्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. गंभीरच्या त्या विधानामुळे चाहत्यांनी त्याच्यावर विराट कोहलीवर एवढा का जळतो असे आरोप लावले आहेत.

भारताने रविवारी (31 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 विश्वचषकातील सुपर 12चा सामना खेळला. त्या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने अर्धशतकी खेळी केली, तर विराट कोहली (Virat Kohli) 12 धावा करत बाद झाला. या सामन्याबाबत गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, “सूर्युमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थवर केलेली 68 धावांची खेळी माझ्या मते आतापर्यंतची टी20मधील सर्वोत्कृष्ठ खेळी होती, जी इतिहासातील कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेली सर्वोत्तम खेळी आहे.” गंभीरच्या मते सूर्यकुमारने कठीण परिस्थितीत ही खेळी खेळली.

गंभीर एवढ्यावरच बोलून थांबला नाही. त्याने पुढे आणखी म्हटले, “सूर्यकुमार यादवची खेळी ही टी20मधील उत्तम आणि कठीन परिस्थितीत कोणीतीच नव्हती. भारताची धावसंख्या 50/5 अशी असताना तेव्हा आपण 40-60 धावा करू शकतो आणि ते पण अशा खेळपट्टीवर  यामुळे ती त्याच्यापेक्षा अवघड टी20 खेळी पाहिली नाही. तुम्ही शतक आणि खेळपट्टीची गोष्ट करू शकता, मात्र कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून खेळलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम टी20 खेळी आहे.”

गंभीरच्या या विधानांवरूनच चाहत्यांनी ट्वीट्स करत त्याची कानउघाडणी केली. त्यातील एकाने म्हटले, ‘विराटने जे पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नमध्ये केले तेव्हाही भारत जवळपास सामना गमावणारच होता, मात्र त्याच्या खेळीने भारत जिंकला. मग भावा तू एवढा का जळत आहेस?’

https://twitter.com/aniketjazz/status/1586697108832530432?s=20&t=CWQRlCv66H17E4hnTOHxIA

https://twitter.com/Vicharofsandeep/status/1586680948053409792?s=20&t=_pm8RnlBZ8YCgacRCuw_tg

https://twitter.com/cricaakash/status/1586713553485996032?s=20&t=mYRT1H5UKajr_0UqOn0WGQ

विराटने पाकिस्तानविरुद्ध भारताचा धावफलक 10/2 असा असताना नाबाद 82 धावांची खेळी केली. ते पण त्याने हॅरीस रौफ याच्या गोलंदाजीवर दोन षटकार खेचले. त्याच्या या खेळीला चाहत्यांनी चांगलीच दाद दिली मात्र गंभीरने जे विधाने केली त्याला साफ नकार दिला. गंभीरने भारताने जिंकलेल्या 2007 आणि 2011च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच महत्वपूर्ण खेळी केली होती, मात्र तो जी काही विधाने करतो यामुळे तो नेहमीच चर्चेत येतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लॉप ठरलेल्या हुडाला माजी कर्णधाराने दिला शहाणपणाचा सल्ला; म्हणाले, “सूर्या तुझ्या समोर असताना…”
हॉटेलचा माफीनामा, विराट कोहलीच्या रुमचा व्हिडिओ लीक झाल्याबद्दल संंबंधित व्यक्तींवर कारवाईचा बडगा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---