भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याने विराट कोहलीविषयी इंडियन प्रीमियर लीगमध्ये झालेल्या वादाविषयी एक विधान केले होते, ज्याची चर्चा झाली. पुढच्या वर्षी भारतीय संघाला आयसीसी वनडे विश्वचषक खेळायचा आहे. पण वनडे विश्वचषकाच्या कर्णधारपदावरून संभ्रम कायम आहे. गंभीरने या संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा याचे नाव सुचवले आहे. पण त्यासाठी रोहितलाही स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) मागच्या एका वर्षात भारतासाठी टी-20 सामना खेळले नाहीत. दोन्ही दिग्गजांनी मोठ्या काळापासून वनडे आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. पण पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी दोघांनी या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणे अपेक्षित आहे. रोहितच्या अनुपस्थितीत मागच्या वर्षभरतात भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी केले. काही दिवसांपूर्वी रोहित टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, अशाही बातम्या आल्या होत्या. पण माजी दिग्गज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या मते रोहित शर्मा टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतो.
नुकत्याच पार पाडलेल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात सलग 10 विजय मिळवले. एकही पराभव न स्वीकारता भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला. पण बलाढ्य ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताला मात दिली. असे असले तरी, गौतम गंभीरच्या मते या एका सामन्यामुळे रोहितच्या नेतृत्वावर शंका उफस्थित करता येणार नाही. गंभीर म्हणाला, “रोहित जर चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर तो टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करू शकतो. फॉर्म चांगला नाही, त्यांना विश्वचषकासाठी निवडलेच नाही पाहिजे. आधी तुम्हाला संघात स्थान मिळवावे लागेल आणि नंतर तुम्ही कर्णधार बनाल.”
गंभीर पुढे असेही म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली नक्कीच आगामी टी-20 विश्वचषकात खेळले पाहिजे. कारण माजी दिग्गजाच्या मते रोहित आणि विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गंभीरच्या मते विश्वचषकासाठी संघ निवड खेळाडूंच्या वयावर नाही, तर त्यांच्या फॉर्मच्या आधारे झाली पाहिजे. (Gautam Gambhir’s statement on Rohit Sharma’s form and captaincy)
महत्वाच्या बातम्या –
इतर फ्रँचायझींशी संपर्क साधला जात असल्याच्या अफवांवर CSKच्या गोलंदाजाची खळबळजनक पोस्ट; म्हणाला, ‘ईमानदारी पैशाने…’
INDvsENG । वानखेडे स्टेडियमबाहेर गोंधळ! मोफत प्रवेशामुळे चाहत्यांनी काय केलं पाहाच