सध्या निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये लीजेंड्स क्रिकेट लीग खेळवली जात आहे. या स्पर्धेत बुधवारी (6 डिसेंबर) गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान इंडिया कॅपिटल्सचा फलंदाज गौतम गंभीर आणि गुजरात जायंट्सकडून गोलंदाजी करणारा श्रीसंत यांच्यात वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर हे प्रकरण चांगलेच वाढले.
गुरुवारी श्रीसंत (Sreesanth) एका लाइव्ह व्हिडिओमध्ये दिसला आणि त्याने गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यावर सामन्यादरम्यान आपल्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला. या सर्व घटनांनंतर गौतम गंभीर यानेही नाव न घेता एक पोस्ट केली आणि त्यानंतर इरफान पठाण ( Irfan Pathan) यानेही गंभीरच्या पोस्टचे समर्थन करत उत्तर दिले.
सामन्यादरम्यान घडलेल्या घटनेनंतर, श्रीसंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक लाइव्ह व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्याने सांगितले की, गौतम गंभीर त्याला वारंवार फिक्सर म्हणत होता आणि त्याला फिक्सर म्हणताना अपशब्द वापरत होता. मी फक्त त्याला म्हणालो तू काय करत आहे. श्रीसंत पुढे म्हणाला की तो हसत होता, आणि त्याने गंभीरसाठी कोणतेही वाईट शब्द वापरले नाहीत.
मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतम गंभीरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये गंभीरचा एक फोटो होता, ज्यामध्ये तो हसताना दिसत आहे. या फोटोसोबत गंभीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा जगाला तुमचे लक्ष वेधून घ्यायचे होते, तेव्हा तुम्ही हसत राहिलात.” गौतम गंभीरने या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. पण चाहत्यांनी उत्तर दिले की हे फक्त श्रीसंतसाठी लिहिले आहे. भारताचा आणखी एक माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही गौतम गंभीरच्या या पोस्टचे समर्थन केले. गंभीरला पाठिंबा देत, त्याने लिहिले, “हसणे हेच सर्वोत्तम उत्तर आहे मित्रा.” (Gautam Gambhir And S Sreesanth Fight Gautam Gambhir’s Support From Irfan Pathan Posting he said Smiling is)
महत्वाच्या बातम्या
Gautam Gambhir And S Sreesanth Fight: वादानंतर श्रीसंतचा गंभीरवर आरोप; म्हणाला, ‘तो तर वीरू भाई…’
अर्रर्र, गंभीरचं पुन्हा फाटलं! लाईव्ह सामन्यात श्रीसंतशी भिडला दिग्गज, डिलीट व्हायच्या आत पाहा व्हिडिओ