---Advertisement---

BCCI आणि NCAने पंड्यासाठी बनवला 18 आठवड्यांचा खास प्लॅन, करतोय हार्ड वर्कआऊट; स्वत: शेअर केला Video

On: गुरूवार, डिसेंबर 7, 2023 5:09 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

Hardik Pandya Recovery: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या मागील महिन्यात पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. पंड्याला विश्वचषकादरम्यान बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघात पुनरागमन करू शकला नाही. विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिकाही खेळला, पण त्यातही पंड्या पुनरागमन करू शकला नव्हता.

अशात भारतीय संघ (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. इथे भारतीय संघाला 3 क्रिकेट प्रकारातील मालिका खेळायच्या आहेत. या दौऱ्यातही हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भारतीय संघातून (Team India) बाहेर आहे. आता तो नक्की संघात कधी पुनरागमन करतो याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, पंड्या आता संघात पुनरागमन करण्यासाठी तयारी करत आहे. जानेवारी 2024 मध्ये भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत पंड्याच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात आहे.

हार्दिकने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ
बीसीसीआय आणि एनसीएने हार्दिक पंड्यासाठी 18 आठवड्यांचा खास प्लॅन तयार केला आहे. यानंतर आता दररोज हार्दिकच्या दुखापतीचे आकलन केले जात आहे. आता स्वत: हार्दिक पंड्याने त्याच्या वर्कआऊटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.   या व्हिडिओला कॅप्शन देत हार्दिक पंड्याने “वर्क इन प्रोग्रेस” (Hardik Pandya Work In Progress) असे लिहिले आहे. या व्हिडिओत तो वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट करताना दिसत आहे. जोपर्यंत पंड्याचा 18 आठवड्यांचा प्लॅन संपत नाही, तोपर्यंत त्याचे संघातील पुनरागमन कठीण आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत भारतीय टी20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवले आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळली जाणार टी20 मालिका
खरं तर, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोन्ही संघामध्ये पहिली 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. यासाठी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतही भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. ती मालिका भारताने 4-1ने नावावर केली होती. या मालिकेत भारतीय संघाने युवा खेळाडूंना उतरवले होते. आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाला युवा खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा असतील. (all rounder hardik pandya latest workout video hardik pandya comeback team india bcci)

हेही वाचा-
बीबीएल 2023मध्ये घोंगावलं Colin Munro नावाचं वादळ! नाबाद 99 धावा चोपत संघाला गाठून दिली ‘एवढी’ धावसंख्या
नाद करा पण हरमनप्रीतचा कुठं! सामना गमावला, पण नावावर केला विश्वविक्रम, बनली जगातली पहिली फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---