---Advertisement---

WMPL 2025: गौतमी नाईकची तोडफोड फलंदाजी, एकाच ओव्हरमध्ये चोपल्या 26 धावा, व्हिडिओ पाहा

On: सोमवार, जून 9, 2025 9:42 PM
---Advertisement---

वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सोलापूर स्मॅशर्सने 19 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यासाठी महत्त्वपूर्ण दावेदारी ठोकली. रत्नागिरी जेट्सला या सामन्यात पराभूत व्हावे लागले असले तरी, त्यांची सलामीवीर गौतमी नाईक हिने एक विक्रम केला.

तेजल हसबनीस व ईश्वरी सावकार यांच्या फलंदाजामुळे सोलापूर स्मॅशर्स संघाने रत्नागिरी जेट्ससमोर 171 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी गौतमी नाईक सलामीला उतरली. यापूर्वीचे सामने गाजवलेली शरयू कुलकर्णी ही सोलापूर संघासाठी पहिले षटक टाकत होती. गौतमी हिने पहिल्याच चेंडूवर पॉईंटच्या दिशेने चौकार वसूल केला. दुसरा चेंडू शरयूने निर्धाव टाकला. तिसऱ्या चेंडूवर लॉंग ऑनला तिने षटकार मारला. त्यानंतर स्वीपचा फटका मारत आणखी चार धावा खात्यात जमा केल्या.‌ अखेरच्या दोन चेंडूवर पुढे सरसावत षटकार मारत तिने षटकात 26 धावा पूर्ण केल्या. डब्लूएमपीएलमधील‌ हे सर्वात महागडे षटक ठरले.

टी20 सामन्यात एक षटकात सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय विक्रम स्नेह राणा हीच्या नावे आहे. तिने 2013-2014 मध्ये पंजाबसाठी खेळताना गुजरात विरुद्ध काजल भरिया हिच्या गोलंदाजीवर 28 धावा वसूल केल्या होत्या. त्यानंतर गौतमी हिचा क्रमांक लागतो.

गहुंजे येथे झालेल्या या सामन्यात सोलापूरची कर्णधार

तेजल हसबनीस हिच्या 39 चेंडूंतील 70 धावा तर, ईश्वरी सावकार हिच्या 75 धावांच्या जोरावर सोलापूर संघाने 170 धावा उभ्या केल्या होत्या. त्यानंतर विजयासाठी मिळालेल्या 171 धावांच्या मोठ्या आव्हानासमोर रत्नागिरीची सलामीवीर गौतमी नाईक हिने 10 चेंडूत 31 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर केवळ कर्णधार स्मृती मंधाना हिने मधल्या फळीत खेळताना 39 चेंडूंमध्ये वेगवान 52 धावा जमवल्या. इतर फलंदाजांना धावांची गती न राखता आल्याने रत्नागिरी संघाला 19 धावांनी पराभूत व्हावे लागले. शानदार 75 धावांची खेळी करणाऱ्या ईश्वरी सावकार हिला सामन्याची मानकरी निवडले गेले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---