पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्ससनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात शरण्या गवारे, विपाशा मेहरा यांनी तर, मुलांच्या गटात क्रिश पटेल, सुशांत दबस या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या शरण्या गवारे हिने सातव्या मानांकित गुजरातच्या भक्ती शहाचा 6-1, 6-0असा सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या विपाशा मेहराने स्वरदा परबचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. अंतिम फेरीत विपाशा मेहरासमोर शरण्या गवारेचे आव्हान असणार आहे.
मुलांच्या गटात चौथ्या मानांकित गुजरातच्या क्रिश पटेल याने बाराव्या मानांकित महाराष्ट्राच्या अमन तेजाबवालाचा 6-1, 6-0असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या सुशांत दबसने आपला शहर सहकारी तिसऱ्या मानांकित दिवेश गेहलोतला 2-6, 7-5, 6-3असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात दिवेश गेहलोटने सुशांत दबसच्या साथीत संदेश कुरळे व साहिल तांबट यांचा 6-2, 6-3 असा, तर अर्णव पतंगे व चेतन गडियार या जोडीने श्री मानव व अनंत मुनी यांचा 6-3, 6-3असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 16 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
शरण्या गवारे(5)वि.वि.भक्ती शहा(7)6-1, 6-0;
विपाशा मेहरा वि.वि.स्वरदा परब 6-3, 6-2;
मुले- क्रिश पटेल(4)वि.वि.अमन तेजाबवाला(12)6-1, 6-0;
सुशांत दबस(2)वि.वि. दिवेश गेहलोत(3) 2-6, 7-5, 6-3;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
दिवेश गेहलोट/सुशांत दबस वि.वि.संदेश कुरळे/साहिल तांबट 6-2, 6-3;
अर्णव पतंगे/चेतन गडियार वि.वि.श्री मानव/अनंत मुनी 6-3, 6-3;
उदित गोगोई/नितीन सिंग वि.वि.सर्वेश बिरमाने/आदित्य बलसेकर 5-7, 6-1, 10-6;
मुली:
भूमिका त्रिपाठी/वैष्णवी आडकर वि.वि.विपाशा मेहरा/हृदया शहा 6-4, 2-6, 10-8;
दिव्या भारद्वाज/स्वरदा परब वि.वि.वेदा रनबोथु/थानुशिता गलीवेटी 6-1, 6-2;
गार्गी पवार/भक्ती शहा वि.वि.रिद्धी काकर्लामुडी/पवित्रा रेड्डी 6-2, 6-3.