आयपीएल २०२१ चा हंगाम अर्ध्यावर आला आहे. ज्यामध्ये पराभवासह स्पर्धेला सुरुवात करणारा धोनीचा चेन्नई सुपर किंग्स ५ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. मात्र, आक्रमक फलंदाजांनी सजलेल्या पंजाब किंग्सचे भाग्य बदलले नाही. गतवर्षीप्रमाणेच पंजाब यावर्षी देखील पहिल्या विजेतेपदासाठी आतुर आहे.
युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलसारखा स्फोटक फलंदाज संघात असतानाही संघ गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर आहे. परंतु, शुक्रवारी(३० एप्रिल) पंजाबने विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ३४ धावांनी विजय नोंदविला. या विजयात केएल राहुल आणि ख्रिस गेलच्या स्फोटक खेळ्यांनी मोठी भूमिका बजावली. आरसीबीविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर गेल आणि संघ आनंद साजरा करताना दिसला. यादरम्यान ख्रिस गेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गेल कॅरम बोर्ड खेळताना दिसतोय.
गेलला मिळाली राणी
आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर पंजाबचा संघ कॅरम खेळताना दिसला. यामध्ये गेल ‘क्वीन’ जिंकल्यानंतर नाचताना दिसत आहे. पंजाब किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडिओला ‘राणी तर बॉसची असते’ असे कॅप्शन दिले आहे. गेल आपल्या मजेदार स्वभावासाठी ओळखला जातो. तसेच, तो नेहमी पारंपरिक कॅलिप्सो नृत्य करत असतो.
Rani toh Boss ni ????#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 #UniverseBoss @henrygayle pic.twitter.com/YXlR7Gmtd1
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 29, 2021
गेलसाठी सुरू आहे संमिश्र हंगाम
ख्रिस गेलने आयपीएल २०२१ मध्ये आत्तापर्यंत फारशी कामगिरी केलेली नाही. त्याने आतापर्यंत ७ सामन्यात केवळ १६५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ४६ धावा आहेत. त्याने त्याच्या नावाप्रमाणे षटकार देखीलमारले नाहीत. आतापर्यंतच्या ७ सामन्यात गेल केवळ ७ षटकार आणि १९ चौकार चौकार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितचा ‘हिट’ कारनामा! टी२० क्रिकेटमध्ये ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय






