---Advertisement---

पहिल्या सामन्यातील ‘किंग’ समजल्या जाणाऱ्या खेळाडूला पंजाबने दाखवला बाहेरचा रस्ता

On: रविवार, सप्टेंबर 20, 2020 8:37 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १३व्या हंगामाला शनिवार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात झाली. चेन्नईने या सामन्यात ५ विकेट्सने मुंबईवर शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब संघात आयपीएलचा दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झाला.

या सामन्यात किंग्ज ११ पंजाब संघाचे नेतृत्त्व केएल राहुलने केले. केएल राहुल व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी अतिशय बोल्ड असा निर्णय घेत या सामन्यात ख्रिस गेलला संघात स्थान दिले नाही. त्याऐवजी ४ परदेशी खेळाडूंमध्ये त्यांनी ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पुरन, ख्रिस जॉर्डन व शेल्डन कॉर्ट्रेल या चौघांना संधी दिली.

ख्रिस गेलचा आयपीएल हंगामातील वैयक्तिक पहिल्या सामन्यातील इतिहास पाहिला तर तो अतिशय चांगला आहे. पहिल्या सामन्यात हमखास खेळणारा खेळाडू म्हणून गेलकडे पाहिले जाते. २००९पासून गेल जेव्हा आयपीएलमधील वैयक्तिक सामन्यात खेळला आहे तेव्हा त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.

२००९ पासून अशा ११ डावात खेळताना गेलने तब्बल ६३.५५च्या सरासरीने ५७२ धावा केल्या आहेत. यात १६२च्या खतरनाक स्ट्राईक रेटने त्याने धावा केल्या आहेत. शिवाय या ११ डावांतील ६ डावांत त्याने ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. २०११मध्ये त्याने पहिल्याच सामन्यात ५५ चेंडूत नाबाद १०२ तर २०१३मध्ये ५८ चेंडूत नाबाद ९२ धावा केल्या होत्या. २०१९मध्येही त्याने ४३चेंडूत ७९ धावांची खेळी केली होती. त्याच गेलला आज पंजाबने पहिल्याच सामन्यात संघात स्थान दिले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---