Paris Olympic 2024 :- उझबेकिस्तानच्या बॉक्सिंग संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर उझबेकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक तुल्किन किलिचेव्ह यांनी आनंदाने उड्या मारल्या. मात्र, त्यांच्या या आनंदावर विरजण पडले. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तुल्किन किलिचेव्ह यांची प्रकृती ढासळू लागली. यानंतर ब्रिटनच्या सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्यांनी त्यांना हृदयविकाराच्या झटक्यातून वाचवले. उझबेकिस्तान संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 5 सुवर्णपदके जिंकली होती. गेल्या 20 वर्षांतील ऑलिम्पिकमधील उझबेकिस्तानची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सर्वजण आनंद साजरा करत असताना किलीचेव्ह यांना मात्र हा आनंद महागात पडला.
गुरुवारी उझबेकिस्तानने सुवर्णपदक जिंकल्यानंतर तुल्किन किलिचेव्ह अस्वस्थ झाले. यानंतर भारतीय वंशाचे डॉक्टर हरज सिंग आणि फिजिओथेरपिस्ट रॉबी लिलिस यांनी तुल्किन किलिचेव्ह यांचे प्राण वाचवले. यादरम्यान दोन्ही डॉक्टरांनी त्याला सीपीआर दिला आणि लिलीसने डिफिब्रिलेटर (हृदयाचे ठोके सामान्य करण्यासाठी वापरलेले मशीन) वापरले. दरम्यान, सुपर हेवीवेट सुवर्णपदक जिंकणाऱ्या बखोदीर जलोलोव्हने सांगितले की, ते गेल्या दोन दिवसांपासून किलिचेव्हच्या संपर्कात असून त्यांच्या बॉक्सर्सनी ऐतिहासिक कामगिरी केली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उझबेकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकणारा जलोलोव्ह पुढे म्हणाला, “किलीचेव्ह हे आमचे प्रशिक्षक किंवा वडील यांच्यापेक्षा बरेच काही आहेत. त्यांनीच आम्हाला मोठे केले आहे. त्यांनी आम्हाला शिक्षण दिले आहे. त्यांनी आमच्यात खेळाची भावना रुजवली. ते नेहमीच माझ्या हृदयात राहिले आहेत. उद्या आम्ही त्यांना रुग्णालयात भेटू.”
त्याचवेळी, किलिचेव्हवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोचिंग टीम पुन्हा वॉर्म-अप एरियामध्ये आली आणि ते सर्व आनंदोत्सव साजरा करत होते. त्यानंतर त्या भागातून ओरडण्याचा आवाज आला, त्यानंतर आम्ही पाहिले की किलिचेव्हची तब्येत ठीक नाही. मात्र, लवकरच ते पूर्णपणे तंदुरुस्त होऊन, आमच्या सोबत पुन्हा एकदा आनंद साजरा करतील.
हेही वाचा –
आश्चर्यकारक! स्टंपला चेंडू लागला तरीही फलंदाज बाद नाही, पाहा VIDEO
धाडसी फलंदाज, भारताच्या मधल्या फळीचा कणा! 1983 वर्ल्डकप विजयाच्या हिरोचा आज वाढदिवस
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं