इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड टूर्नामेंट २०२२ मध्ये रोज नवनवे विक्रम बनताना आणि जुने विक्रम मोडताना दिसत आहेत. सोमवारी (२२ ऑगस्ट) या स्पर्धेतील २२ वा सामना वेल्श फायर विरुद्ध सदर्न ब्रेव संघात खेळला गेला. सदर्न ब्रेव संघाने हा सामना ९ विकेट्सने जिंकला. सदर्न ब्रेवला हा सामना जिंकून देण्यात डावखुरा वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टन याचा मोलाचा वाटा राहिला. जॉर्जने या सामन्यात किफायतीर गोलंदाजी करत संघाला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या.
२५ वर्षीय जॉर्जने (George Garton) या सामन्यात वेल्श फायर संघाच्या जितक्याही विकेट्स घेतल्या, त्या सर्व शून्य धावांवर घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीरही बनवण्यात आले.
१५ चेंडूत बदलला सामना
१०० चेंडूंच्या या सामन्यात जॉर्जने फक्त १५ चेंडू फेकले. या १५ चेंडूंमध्ये त्याने वेल्श फायर संघाची वरची फळी उध्वस्त केली. त्याने जॅकब बेथल, कर्णधार जोश कॉब आणि बेन डकेट यांच्या विकेट काढल्या. विशेष म्हणजे त्याने या तिनही फलंदाजांना शून्यावर बाद केले. डावातील दुसऱ्याच चेंडूवर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातून त्याने बेथलला बाद केले. बेथल पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर वेल्श फायरचा कर्णधार कॉबला त्याने शून्यावर त्रिफळाचीत केले. कॉब २ चेंडू खेळून बाद झाला.
George. Garton.
😱#TheHundred pic.twitter.com/5DeFOe9Vz0
— The Hundred (@thehundred) August 22, 2022
त्याचा तिसरा व शेवटचा शिकार ठरला डकेट. डकेटने कसेबसे त्याचे ३ चेंडू खेळून काढले. परंतु त्याला एकही धाव घेता आली नाही. परिणामी डकेटही शून्यावर माघारी परतला. अशाप्रकारे १५ चेंडू फेकताना फक्त ७ धावा देत त्याने ३ विकेट्स काढल्या.
Too good. 🔥#TheHundred pic.twitter.com/YtXauhmnjT
— The Hundred (@thehundred) August 22, 2022
असा राहिला सामना
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, वेल्श फायरने प्रथम फलंदाजी करताना १०० चेंडूत ८ विकेट्सच्या नुकसानावर १२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात सदर्न ब्रेवने पॉल स्टर्लिंगच्या नाबाद ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर ८२ चेंडूतच ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लवकरच चाहत्यांना मैदानात होणार बुमराहचे दर्शन! पोस्ट शेअर करत दिली इन्जूरी अपडेट
‘लोक सगळं विसरून जातील’, विराटच्या खराब फॉर्मवर शास्त्री गुरुजींची विशेष टिपण्णी
झिम्बाब्वेला क्लिन स्वीप करत भारताचा पाकिस्तानला ‘दे धक्का’, वनडे क्रमवारीत पोहोचला ‘या’ स्थानी