वर्ल्डकप विजेत्या आणि फीफा क्रमवारीतमध्ये नंबर ३ असलेल्या जर्मनीने चिलीचा १-० असा धुव्वा उडवत काॅन्फ़ेडरेशन कप जिंकला. जर्मनीचा हा पहिलावहिला काॅन्फ़ेडरेशन कप आहे.
गत विजेता तसेच ४ वेळेसचा विजेता ब्राझील या वर्षी पात्रता फेरीतूनच बाहेर पडला. २००५, २००९, २०१३ असे ३ सलग काॅन्फ़ेडरेशन कप ब्राझीलने आपल्या नावे केले होते.
जर्मनीचे दिग्गज खेळाडु मैनुएल नुएर, टोनी क्रुझ, ओझील, थाॅमल मुलर यांच्या अनुपस्थितित टीम बी समजल्या जाणाऱ्या संघाने काल २० व्या मिनिटला गोल करुन १-० अशी विजयी आघाडी घेतली. ती आघाडी शेवटपर्यंत राखत त्यांनी विजय मिळवला.
तसेच काल तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पोर्तुगालने मेक्सिकोचा २-१ असा पराभव केला. स्टार खेलाडु रोनल्डोच्या उनुपस्थितित अतिरिक्त वेळेत गेलेल्या सामन्यात पेपे आणि सिल्वाने २ गोल केले. विषेश म्हणजे मेक्सिकोचा १ गोल पण पोर्तुगालच्या नेटो चाच ओन गोल होता.
– नचिकेत धारणकर (टीम महा स्पोर्ट्स )