देवांश सुपर किंग हा सलग तिसऱ्या वर्षी सहभागी होणार संघ आहे. क्रिकेट व कबड्डी ची विषेश आवड असणारे श्री. दिनेश मेढेकर यांनी हा संघ पुरस्कृत केला आहे. संघ प्रशिक्षकपदी उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडूप व सेंट्रल रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडु सागर परब हे असणार आहेत. तर संघाच्या व्यवस्थापक म्हणून उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडुपचे नवनाथ सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
घाटकोपर विभागातील ओंकार सकपाळ तर उपनगर विभागातील अभिषेक सोळंकी हे दोन स्टार खेळाडु संघात आहेत. चढाईपटू अभिषेक सोळंकीला ७,४०० रुपयाची बोली लावून संघात घेतलं आहे. तर रोशन हेडगे ५,८०० रुपयांची बोली लावत देवांश सुपर किंगने घेतले.
घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ च आयोजन करण्यात येत आहे.
देवांश सुपर किंग
१) समीर नौशादअली खान
२) राहुल वाघमोडे
३) करण कोकरे
४) ध्यानेश नाईकरे
५) ओंकार सकपाळ
६) अभिषेक सोळंकी
७) राकेश हेडगे
८) प्रतीक गायकवाड
९) अल्पेश पारंगे
१०) गुफरान खान
११) भावेश पवार
१२) अंकित जाधव
प्रशिक्षक- सागर परब
व्यवस्थापक- नवनाथ सावंत