आई शिंब्रादेवी वॉरियर्स हा संघ पर्व 2 मध्ये पुरस्कृत करण्यात आला आहे. कबड्डीची विशेष आवड असलेले घाटकोपर पूर्वचे शिवसेना शाखाप्रमुख श्री जितेंद्र परब यांनी हा संघ पुरस्कृत केला आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी खेळाडु श्री निलेश उगले हे संघ प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तर मुंबई उपनगगरचे सदस्य योगेश रेवाळे हे संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहतील.
घाटकोपर विभागातील मनीष लाड तर उपनगर विभागातील सुमेध सावंत हे दोन स्टार खेळाडु संघात आहेत. विनायक शिंदे याला ५,००० रुपयाची बोली लावून संघात घेतलं आहे. संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे.
घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ च आयोजन करण्यात येत आहे.
आई शिंब्रादेवी वॉरियर्स
१) मनीष लाड
२) विकास कदम
३) महेश वायकर
४) दादा मोहिते
५) स्वप्नील भोईर
६) विनायक शिंदे
७) सुमेध सावंत
८) सूरज जाधव
९) रोहित सावंत
१०) राजेश साळुंखे
११) अनिश यादव
१२) सोनू पवार
प्रशिक्षक– निलेश उगले
व्यवस्थापक- योगेश रेवाळे