---Advertisement---

अखेर गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगाला खरेदीदार मिळाला, ‘या’ संघात झाले सामील

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 7:17 PM
---Advertisement---

भारतात क्रिकेटच्या इंडियन प्रीमीयर लीगनंतर सर्वात लोकप्रीय लीग म्हणजे प्रो कबड्डी. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामाची घोषणा झाली आहे. या हंगामासाठी मुंबईमध्ये ३ दिवसीय लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (३१ ऑगस्ट) या लिलावाचा शेवटचा दिवस असून काही कबड्डीपटूंच्या हाती निराशा लागली आहे. तर काहींच्या बोलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या लीलावात मंगळवारी ब आणि क गटातील खेळाडूंचा लिलाव झाला. यात महाराष्ट्रातील स्टार कबड्डीपटू गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगा यांचाही समावेश होता. त्यांना पहिल्या फेरीत कोणीही पसंती दाखवली नव्हती. मात्र, अखेर नंतरच्या फेरीत त्यांना खरेदीदार मिळाले आहेत.

डाव्या कॉर्नरचा कबड्डीपटू आणि डिफेंडर गिरीश इर्नाकला त्याच्या मुळ किमतीत म्हणजेच २० लाखात गुजरात जायंट्सने खरेदी केले आहे. तर रिशांकला बंगाल वॉरियर्सने २० लाखांच्या मुळ किमतीतच खरेदी केले आहे. त्यामुळे आता प्रो कबड्डीमध्ये हे दोन्ही स्टार खेळाडू नव्या संघांकडून खेळताना दिसतील.

गिरीशने आत्तापर्यंत प्रो कबड्डीमध्ये खेळताना १०६ सामन्यांत २६२ टॅकल पाँइंट्स कमावले आहेत. तर, रिशांकने १२१ सामन्यांत ६२४ रेड पाँइंट्स मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

रविंद्र पेहेलला लागली ७४ लाखांची बोली; ‘या’ संघाच्या ताफ्यात झाला सामील

अबोजर मिघानीची बंगाल वॉरियर्समध्ये रॉयल एन्ट्री; ‘इतक्या’ लाखांच्या बोलीसह दिले संघात स्थान

दीपक हुड्डाच्या किमतीवर चाहते नाराज, पीकेएल लिलावात केवळ ‘इतक्या’ लाखांची लागली बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---