-शारंग ढोमसे
महाराष्ट्राला ११ वर्षांनंतर राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या रिशांक देवाडीगा आणि गिरीश एरणाक तसेच आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सोनाली शिंगटे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यू मुंबा संघाकडून प्रो कबड्डी लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलेल्या रिशांकने ६५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं कर्णधारपद भूषवलं होते.याच स्पर्धेत महाराष्ट्राने ११ वर्षानंतर ऐतिहासिक असे विजेतेपद मिळवले होते.रिशांक आणि गिरीश या दोघांनाही या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती.याच कामगिरीच्या जोरावर या दोघांचीही भारतीय संघात निवड झाली. दुबई येथे झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत रिशांक आणि गिरीश यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यानंतर झालेल्या आशियाई स्पर्धेसाठी सुद्धा या दोघांची भारतीय संघात निवड झाली.या स्पर्धेत भारताने कांस्यपदक मिळवले होते.
रेल्वेकडून राष्ट्रीय स्पर्धेत गेल्या २-३ वर्षांत चमकदार कामगिरी केलेल्या सोनाली शिंगटेला सुद्धा शिव छत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.रेल्वेसाठी खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना विलंबाने पुरस्कार मिळण्याची परंपरा या निमित्ताने मोडीत निघाली.मुंबई शहरातील स्थानिक शिवशक्ती संघाकडून खेळणाऱ्या सोनालीने गेल्या काही कबड्डी हंगामात बहारदार कामगिरी केली आहे. मुंबई येथे झालेल्या ३ ऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत रेल्वेला विजय मिळवून देण्यात सोनालीचा सिंहाचा वाटा होता.२०१८ ला जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या भारतीय संघात सोनालीचा समावेश होता.त्यानंतर,नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत देखील सोनालीने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
रिशांक आणि गिरीश शिव छत्रपती पुरस्कार मिळवणारे अनुक्रमे ४२वे व ४३वे पुरुष कबड्डीपटू ठरले आहेत तर सोनाली हा पुरस्कार मिळवणारी ५६वी महिला कबड्डीपटू ठरली आहे!
शिव छत्रपती पुरस्कार,कबड्डी आणि आकडेवारी:
१)पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू: ९९
महिला:५६
पुरुष:४३
२)मागील ३ विजेते:
पुरुष:
१. २०१७-१८:विकास काळे
२. २०१४-१५:नितीन मदने
३. २०१०-११:जितेश जोशी
महिला:
१. २०१६-१७:सायली केरीपाळे
२. २०१६-१७: कोमल देवकर
३. २०१५-१६:पूजा शेलार
३.अर्जुन आणि शिव छत्रपती असे दोन्ही पुरस्कार मिळवणारे कबड्डीपटू: ०८
महिला: ०३
पुरुष: ०५
संपूर्ण यादी – शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा; ४८ खेळाडूंना मिळणार पुरस्कार
वाचा????https://t.co/zf2sTyIvRA????#म #मराठी #ShivChhatrapatiAward— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020
'ही' आहे रोहित शर्माची नवी सोशल मीडिया मॅनेजर; मुंबई इंडिसन्सने शेअर केला फोटो
वाचा- ????https://t.co/u00cxAgP22????#म #मराठी #Cricket @mipaltan @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020