---Advertisement---

माझा होशील का? चेन्नई-बेंगलोर सामन्यात मुलीने सर्वांसमोर केले मुलाला प्रपोज, Video तुफान Viral

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग, या जगप्रसिद्ध टी२० लीगमध्ये दिसणारे चेहरे काही क्षणांमध्ये चर्चेत येतात. क्रिकेटपटूंपासून ते स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या दर्शकांपर्यंत सर्वांना ही गोष्ट लागू होते. बुधवारी (०४ मे) पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने असताना स्टेडियममध्ये एक रोमँटिक क्षण पाहायला मिळाला. चक्क एका तरुणीने सर्वांसमक्ष एका युवकाला लग्नासाठी मागणी घातली. 

https://twitter.com/HitKandoriya/status/1521894381271531520?s=20&t=t6_mWFjY67ub6pOWdUyVQg

बेंगलोरच्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावातील अकराव्या षटकादरम्यान ही घटना घडली. सामना पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणीने आपल्या मित्राला गुडघ्यावर बसत प्रपोज केले. यावेळी तिच्या हातात अंगठी होती. तरुणीने आपल्या मित्राला प्रपोज केल्यानंतर युवकानेही उशीर न करता तिला लगेच होकार दिला व तिला मिठी मारली. हा रोमँटिक क्षण कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफर यांनीही या क्षणाचा फोटो शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘एक हुशार मुलगी बेंगलोर संघाच्या चाहत्याला प्रपोज करत आहे. जर तो बेंगलोर संघाशी नम्र राहत असेल, तर तो त्याच्या जोडीदारासोबतही नम्र राहिल. खूप छान आणि प्रपोज करण्यासाठी खूप चांगला दिवस निवडला.’

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

पुण्यातच एका जोडीने केला होता खुल्लम खुल्ला किस 

दरम्यान एखाद्या दर्शकाने वेगळे काही कृत्य करत चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी (०२ एप्रिल) पुणे येथे झालेल्या सामन्यात स्टँड्समध्ये बसलेली एक जोडी कॅमेरावर एकमेकांना किस करताना (Couple Kissing In IPL Match) दिसली होती. यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या काकू त्यांच्याकडे पाठ फिरवून बसलेल्याही दिसल्या होत्या. या प्रसंगाचे फोटो वाऱ्यासारखे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

https://twitter.com/Kumarpintu12171/status/1510311944997142528?s=20&t=kA_jMNToStHoZvhx4mqtGA

बेंगलोरने काढला पराभवाचा वचपा

पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई संघाला २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावत १६० धावाच करता आल्या आणि बेंगलोरने हा सामना खिशात घातला. उभय संघांनी चालू हंगामात आमने सामने येण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी चेन्नईने बेंगलोरला पराभूत केले. आता बेंगलोरने मागील पराभवाचा वचपा काढत चेन्नईला १३ धावांनी पराभूत केले आहे. हा त्यांचा हंगामातील सहावा विजय होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

प्रेम करुया खुल्लम खुल्ला! IPLच्या मैदानावर पहिल्यांदाच एकमेकांना किसsss करताना जोडपे कॅमेरात कैद

मोईन अलीचा मॅजिक बॉल, बॅट- पॅडच्या मधून जात चेंडूने उडवल्या यष्ट्या; खुद्द विराटही पाहातच राहिला

सीएसकेची वाढली डोकेदुखी! कॅच घेण्याच्या नादात जडेजाने स्वत:लाच केले जखमी, मैदानावर लागला विव्हळू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---